एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुखशल्य चिकित्सा विभागास जानेवारी 2023 चा बेस्ट परफॉर्मस् अवॉर्ड उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांच्या हस्ते डॉ. सिराज बादल यांना पुरस्कार प्रदान

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील  मुखशल्य चिकित्सा विभागास जानेवारी 2023 चा बेस्ट परफॉर्मस् अवॉर्ड  उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांच्या हस्ते डॉ. सिराज बादल यांना पुरस्कार प्रदान

लातूर – येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील मुख एवंम् शल्य चिकित्सा विभागाने सर्वोत्तम कामगीरी करुन जानेवारी 2023 या महिन्याचा बेस्ट परफॉर्मस् अवॉर्ड मिळवला आहे.

माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांच्या हस्ते मुख एवंम् शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. सिराज बादल व त्यांचे सहकारी यांना सन्मानचषक देऊन हे अवॉर्ड देण्यात आले. एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय व रुग्णालयातील विविध नऊ विभागांपैकी दर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या विभागास सदरील अवॉर्ड जानेवारी 2023 पासून देण्यात येत आहे.

मुख एवंम् शल्य चिकित्सा विभागाच्या सर्वोत्तम कामगीरी मध्ये विभाग प्रमुख डॉ. सिराज बादल, डॉ. राहुल लटुरिया, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. गोविंद चांगुले, डॉ. पुनम नागरगोजे, डॉ. गोपाळ नागरगोजे, डॉ. व्यंकटेश हांगे, डॉ. अपूर्वा देशपांडे, डॉ. कोमल हारडे, परिचारीका माहेश्वरी, वर्षा फड, लिपिक महादेव मुंडे, सेवक निलकंठ नवाडे, परमेश्वर केदार या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकसंघपणे आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडून सर्वोत्तम कामगीरीचे चषक पटकावले आहे.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. अजित जानकर, डॉ. ओम बघीले, डॉ. रामचंद्र कबीर, डॉ. गौरी उगले, डॉ. सिराज बादल, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. विजयालक्ष्मी सुलतानपुरी, डॉ. राघवेंद्र मेत्री, डॉ. अजित शिंदे, डॉ. शशी पाटील, डॉ. मधुरा, डॉ. शितल वाघ, डॉ. गोपाळ नागरगोजे, डॉ. स्नेहा चोले, डॉ. योगेश नागरगोजे, डॉ. सुजित झाडके, डॉ. प्रग्या भटनागर, कार्यालय अधिक्षक बळीराम हांडगे, ग्रंथपाल ज्ञानोबा केंद्रे, शंकर ससाने, श्रीधर घुले, सहाय्यक ग्रंथपाल सौ. बिक्कड, सौ. गंगासागर गित्ते, श्री सावंत आदी उपस्थित होते.