टाळूला वाढलेली मासाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञांची कामग‍िरी

टाळूला वाढलेली मासाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञांची कामग‍िरी

टाळूला वाढलेली मासाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश  यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञांची कामग‍िरी

लातूर - येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात एका 70 वर्षीय रुग्णांच्या तोंडात टाळूवर वाढलेली पाव किलोंची मांसाची गाठ कान-नाक-घसा तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया करुन यशस्वीरित्या बाहेर काढली आहे. गणपती विठ्ठल यादव (रा. बोरफळ, ता. लातूर) असे शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांचे नाव असून तब्बल 40 वर्षापासून टाळूवर असलेली मांसाची गाठ तोंडातून बाहेर निघाल्यामुळे यादव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गणपती यादव यांना 30 वर्षाच्या वयात तोंडात टाळूवर मासाची छोटी गाठ आली होती. काही त्रास होत नसल्याने त्यांनी तोंडातील गाठीकडे दुर्लक्ष केले मात्र गेल्या दीड वर्षात गाठ वेगाने वाढत असल्याने गणपती यादव यांना खाण्या-पिण्यास, बोलण्यास अडथळा येत होता व त्यांचा आवाजही पुर्णत: बोबडा झाला होता.

दरम्यान दि. 20 जून रोजी गणती यादव यांची यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. गणेश कुलकर्णी यांनी प्राथमीक तपासणी केली असता त्यांच्या तोंडात मासाची मोठी गाठ दिसून आली. त्यानंतर पुढील उपचारासाठी यादव यांना रुग्णालयात दाखल करुन सीटी स्कॅन व अवश्यक तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना ‘प्लेमोर्फिक एडेनोमा’ या आजाराचे निदान झाले. तोंडातील गाठीमुळे यादव यांना त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व दि. 23 जून रोजी डॉ. शैला बांगड व डॉ. गणेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. फैज रहेमान, डॉ. तेजस आढल्ये यांनी गणपती यादव यांच्या तोंडातील गाठीवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन टाळूवर वाढलेली मासाची गाठ शिताफीने बाहेर काढली. तोंडातील शस्त्रक्रियेवेळी रक्तस्त्राव वेगाने होतो मात्र डॉक्टरांनी रक्तस्त्राव नियंत्रणात आणून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. रुग्णाच्या तोंडात मोठी गाठ असल्याने या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. संजय बेंबडे, डॉ. घनश्याम सांगवीकर, डॉ. शुभम ओस्तवाल यांनी रुग्णांच्या नाकावाटे नळी टाकून भूल दिली तर या शस्त्रक्रियेसाठी डॉ. गिरीजा नावडीकर, परिचारीका रेखा पल्लेवाड, सेवक अमिर शेख, अजय अकुच यांनी सहाय्य केले.

शस्त्रक्रियेव्दारे तोंडातील गाठ काढल्यानंतर गणपती यादव यांना पुर्वी होत असलेला त्रास थांबला असून त्यांना पूर्वीप्रमाणे स्पष्टपणे बोलता येत आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर यादव हे व्यवस्थितपणे खात-पित असून त्यांना नुकतीच रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.