बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयात नेत्र तंत्रज्ञ होण्याची संधी
बी.एस्सी. ऑप्टोमेट्री पदवी आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमास लातूरात मिळणार प्रवेश
लातूर – माईर्स एमआयटी, पुणे संचलित महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील बी. एस्सी. ऑप्टोमेट्री पदवी आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील, विशेष करुन ग्रामीण भागातील 12 वी उत्तीर्ण तरुणांना नेत्र तंत्रज्ञ होण्याची संधी उपलब्ध झाली असून या अभ्यासक्रमामुळे समाजासाठी अधिकचे नेत्र तंत्रज्ञ उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील बी. एस्सी. ऑप्टोमेट्री पदवी आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री या अभ्यासक्रमाचे प्रवेश नुकतेच सुरु झाले असून विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी दिली.
माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभागाच्या माध्यमातून गेल्या तिन दशकात रुग्णांच्या डोळ्यांची अत्याधुनिक उपकरणाद्वारे तपासणी, लेझर उपचार, तातडीचे उपचार, 24 तास रुग्णसेवा, उत्कृष्ट सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचा चमु, नेत्रपेढी (आय बँक) या माध्यमातून रुग्णांप्रती असलेला सेवाभाव दाखवून दिलेला आहे. त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमातील सहभाग, डोळ्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संस्थांशी असलेले संबंध व कार्य याची दखल घेवून या संस्थेच्या महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील बी. एस्सी. ऑप्टोमेट्री पदवी आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री या दोन अभ्यासक्रमांना शासनाने मान्यता प्रदाण केलेली आहे. या अभ्यासक्रमांना शासनाने ठरवून दिलेल्या जात प्रवर्गनिहाय प्रवेश दिले जाणार असून एकुण प्रवेशापैकी 15 टक्के प्रवेश हे संस्थेच्या व्यवस्थापन कोट्यातून दिले जाणार आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे नेत्र रोगांचे निदान व उपचार करणे आता सोपे झाले आहे. मोबाईल, टॅब सह संगणकाचा अतिवापर व रसायनयुक्त खाद्यामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात पारंगत मनुष्यबळाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या अनुषंगाने देशात ऑप्टोमेट्री कॉन्शिल ऑफ इंडिया स्थापन झाली असून केंद्र शासनाने पॅरामेडीकल कोर्सेस संचालनालय व कौन्सिल स्थापन होऊ घातली आहे. त्यांच्याकडे या पदवीधरांना ऑप्टोमेट्री तंत्रज्ञ म्हणून स्वतंत्रपणे प्रॅक्टीस करण्याची परवानगी मिळणार असून त्याअंतर्गत ऑप्टोमेट्री पदवीधारकांना डोळ्यांच्या प्राथमिक उपचारासाठी दृष्टी / व्हिजन सेंटर चालवण्याचा परवाना मिळणार आहे.
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय हे वैद्यकीय महाविद्यालयाशी सलग्नित असणारे महाराष्ट्रातील एकमेव असून या महाविद्यालयाने पहिले तीन वर्ष यशस्वीपणे पुर्ण करुन चौथ्या वर्षात पदार्पन केले आहे. बी. एस्सी. ऑप्टोमेट्री पदवी आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री या अभ्यासक्रमांचे नियमीत व दर्जेदार शिक्षण देणारे हे मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील ग्रामीण भागातील तरुणांना नेत्र तंत्रज्ञ होण्याची संधी लातूर येथे उपलब्ध झाली आहे.
विज्ञान शाखेतून 12 उत्तीर्ण (पी. सी. बी. ग्रुपसह) विद्यार्थ्यांना महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, लातूर येथे प्रवेश घेता येईल. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी (02382 – 227207, मो. 7972704850, 9049298502, 8888248469) या दूरध्वनीवर संपर्क करावा.
ऑप्टोमेट्री क्षेत्रात तरुणांना करिअर घडवण्याची संधी
नेत्रशास्त्र विषयात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध असून त्यासाठी लागणारी शैक्षणीक पात्रता व अनुभव असणाऱ्यांना स्वताचे करिअर घडविण्याची संधी उपलब्ध आहे. नेत्र तंत्रज्ञ होण्याकरीता मर्यादीत ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध असून महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयाने बी. एस्सी. ऑप्टोमेट्री पदवी आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री या अभ्यासक्रमांची सुरुवात करुन या क्षेत्रातील करिअरचे दालन उघडे केले आहे. या क्षेत्रात येवू पाहाणाऱ्या तरुणांना नेत्र तंत्रज्ञ अधिकारी म्हणून शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नेत्र तंत्रज्ञ म्हणून स्वत: अथवा खाजगी नेत्र रुग्णालयात सेवा देता येईल, नेत्र उपकरणांची निर्मीती करणाऱ्या व्यवसायीक कंपन्यामध्ये तज्ज्ञ म्हणून सेवा करता येईल, मेक इन इंडिया योजनेंतर्गत आयटेक कंपनीच्या माध्यमातून डोळ्यांसाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मीती करुन पुरवठा करता येईल व शॉपच्या माध्यमातून नेत्र उपकरणांची विक्रीही करता येईल, त्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही काम करता येईल. शिवाय बी. एस्सी. ऑप्टोमेट्री पदवीधारक पदवी नंतरच्या सर्व स्पर्धा परिक्षांसाठी पात्र असणार आहेत, अशी माहिती नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी दिली.