बारावी परिक्षेत मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
बारावी परिक्षेत मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
लातूर – बारावी परिक्षेत नांदगाव (ता. लातूर) येथील माईर एमआयटी पुणे संचलित मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून कला आणि विज्ञान या दोन्ही शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शाखेचे एकूण 45 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एकूण 10 विद्यार्थी विषेश प्राविण्यासह व 34 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला असून विज्ञान शाखेत कु. निकिता बापुराव पवार (81.50 टक्के) प्रथम, कु. अमृता रमेश भोसले (81.17 टक्के) व्दितीय तर कु. ऋतूजा हरिभाऊ पवार हिने (80.67 टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
तसेच कला शाखेचे एकूण 33 विद्यार्थी या परिक्षेस बसले होते. त्यापैकी एकूण 3 विद्यार्थी विषेश प्राविण्यासह व 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 5 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून प्रथम - कु. वैष्णवी बालासाहेब क्षीरसागर (81.50 टक्के), व्दितीय - कु. ज्ञानदा हनुमंत पवार (79.83 टक्के) तर तृतिय क्रमांक कु. रेखा सतीश किनिकर हिने (77.50 टक्के) गुण मिळवून पटकावला असून कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांचा 100 टक्के निकाल लागला आहे.
बारावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेले सर्व विद्यार्थ्यांचे माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. हनुमंत कराड, प्राचार्य सायस मुंढे, प्रा. डॉ. अंगद चित्ते, प्रा. राजेश कांबळे, प्रा. तानाजी पवार, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा. बंडाप्पा उपासे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतून अभिनंदन होत आहे.