प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा दंत आरोग्य, फिजिओथेरपी शिबिरात 381 रुग्णांवर मोफत उपचार

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा  दंत आरोग्य, फिजिओथेरपी शिबिरात 381 रुग्णांवर मोफत उपचार

लातूर – माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा 82 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या दंत आरोग्य शिबिरात 192 रुग्णांची व फिजीओथेरपी उपचार शिबिरात 189 रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले तर अनेक ज्येष्ठ नागरीकांना संपूर्ण दातांची कवळी वाटप करण्यात आले.

एमआयडीएसआर दंत रुग्णालयाच्या वतीने लातूर येथील विद्या विकास माध्यमिक विद्यालयात मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात दंत रोग तज्ज्ञांकडून मुख व दंत रोग, हिरड्या व त्यासबंधी आजार, दातांना लागलेली किड, दुधाचे न पडलेले दात व वेडेवाकडे दात अशा 192 शालेय विद्यार्थ्यांच्या दंत रोगाची तपासणी करुन प्राथमिक समुपदेशन करण्यात आले. या शिबिरास मुख्याध्यापक बी.जी. चोले, दंत रोग तज्ज्ञ डॉ. प्रियंका मुंडे व डॉ. मयुर दुग्ग्ड यांची प्रमुख उपस्थिती होती.

दातांची निगा कशी राखावी, दुधाच्या दातांचे महत्व, दंत रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, अपघातानंतर दातांची घ्यावयाची काळजी, लहान मुलांना उद्भवणारे वेगवेगळे दंत रोग, दंत रोग जडल्यानंतर घ्यावयाचे उपचार या विषयी डॉ. सचिन चव्हाण, डॉ. ऋता गायकवाड, डॉ. शिवांगी स्वामी, डॉ. प्रगती शेरखाणे, डॉ. श्रुती शिंदे, डॉ. पुजा शेळके, डॉ. प्रतिक्षा थगनर यांनी विस्तृत माहिती दिली.

तसेच एमआयडीएसआर दंत रुग्णालयात वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. या मध्ये कृत्रिम दंत रोपन विभागाच्या वतीने अनेक ज्येष्ठ नागरीक रुग्णांना संपूर्ण दातांची कवळी वाटप करुन त्याचा वापर, स्वच्छता व दात नसलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध विविध उपचार पध्दती या विषयी माहिती देवून दातांबरोबर निरोगी हिरड्याचेही महत्व सामजावून सांगण्यात आले. तसेच दंत रुग्णालयातील विविध विभागातील रुग्णांना दातांच्या स्वच्छतेबद्द्ल माहिती सांगून टुथपेस्टचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत डिजीटल लॅबररीचे उपप्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. अजित जानकर, डॉ. ओम बघीले, डॉ. रामचंद्र कबीर, डॉ. गौरी उगले, डॉ. सिराज बादल, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. विजयालक्ष्मी सुलतानपुरी, डॉ. राघवेंद्र मेत्री, डॉ. अजित शिंदे, डॉ. शशी पाटील, डॉ. मधुरा, डॉ. शितल वाघ, डॉ. स्नेहा चोले, डॉ. योगेश नागरगोजे, कार्यालय अधिक्षक बळीराम हांडगे, ग्रंथपाल ज्ञानोबा केंद्रे, श्रीधर घुले, सहाय्यक ग्रंथपाल सौ. बिक्कड, सौ. गंगासागर गित्ते, श्री सावंत आदी उपस्थित होते.

डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन, जिल्हा क्रिडा संकुल येथे मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, मणक्याचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, हातापायांना मुंग्या येणे, मार लागलेले खेळाडू अशा विविध आजारांच्या 189 रुग्णांवर फिजिओथेरपी तज्ज्ञांकडून विविध प्रकारच्या व्यायामाव्दारे उपचार करण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील कामाची, बसण्याची योग्य पद्धत, निरोगी जिवनशैली या विषयी उपस्थित नागरीकांना माहिती देण्यात आली.

या शिबिरास जिल्हा क्रिडा अधिकारी जग्गनाथ लकडे, प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनचे डॉ. बी. आर. पाटील, तालुका क्रिडा अधिकारी श्री कराड यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात डॉ. पल्लवी जाधव, डॉ. गौरव भटनागर, डॉ. शितल घुले, डॉ. मोहम्म्द झिशान, डॉ. सलीम शेख, डॉ. मधुरा कुर्डूकर यांनी सेवा बजावली.