सौ. सुमित्राबाई तुळशीराम कराड यांचे दुःखद निधन

सौ. सुमित्राबाई तुळशीराम कराड यांचे दुःखद निधन
लातूर - लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील माजी सरपंच तथा माईर एमआयटी पुणेचे विश्वस्त तुळशीरामअण्णा कराड यांच्या पत्नी सौ. सुमित्राबाई तुळशीराम कराड यांचे आज रविवारी पहाटे सहा वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता रामेश्वर येथे अंत्यविधी होणार आहे.
सौ. सुमित्राबाई कराड या प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या भावजई, डॉ. हनुमंत कराड, डॉ. मंगेशबापु कराड, बालासाहेब कराड यांच्या मातोश्री व प्रा. राहुल कराड, आ. रमेशआप्पा कराड यांच्या चुलती (काकू) होत्या.
सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या मनमिळाऊ आणि आध्यात्मिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या सुमित्राबाई तुळशीराम कराड या काही दिवसापासून आजारी होत्या. रविवारी पहाटे वयाच्या 83 व्या वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दिर, भावजय, तीन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सौ सुमित्राबाई तुळशीराम कराड यांच्यावर आज रविवारी सायंकाळी चार वाजता रामेश्वर ता. लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.