मुलांचे मौखिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी सुरूवातीपासून काळजी घ्या ; डॉ. महेश दडपे यांचे आवाहन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा

मुलांचे मौखिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी सुरूवातीपासून काळजी घ्या ; डॉ. महेश दडपे यांचे आवाहन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा

मुलांचे मौखिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी सुरूवातीपासून काळजी घ्या ; डॉ. महेश दडपे यांचे आवाहन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा

लातूर – मौखिक आरोग्य हे सामान्य आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. खराब मौखिक आरोग्य हे इतर रोगांशी जोडलेले असून ते अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे लहान मुलांचे मौखिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी सुरुवातीपासून त्यांचे दात, हिरड्या व संपूर्ण मुखाची नियमित स्वच्छाता ठेऊन काळजी घ्यावी, असे आवाहन, बाल दंत रोग तज्ज्ञ प्रा. डॉ. महेश दडपे यांनी केले.

येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाल दंत रोग विभाग येथे जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. महेश दडपे बोलत होते. यावेळी बाल दंत रोग तज्ज्ञ डॉ. निलोफर शेख, डॉ. प्राजक्ता गायकवाड, डॉ. सायली मुंडे उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना डॉ. महेश दडपे म्हणाले की, मानवी शरीराचा आरसा म्हणून मुखाकडे पाहिले जाते. तोंड, दात आणि शरीर यांचा परस्पर सबंध असल्याने त्यांच्या आरोग्यावर संपूर्ण शरीराचे आरोग्य निर्भर आहे. त्यानुसार यावर्षीच्या मौखिक आरोग्य दिनाची थिम ही ‘आनंदी मुख…आनंदी शरीर’ अशी असून प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याची नियमित काळजी घेतल्यास मौखीक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

मुखाचे आरोग्य चांगले नसेल तर मुखात विविध व्याधी जडू शकतात. मुख स्वच्छतेकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास हिरड्यांना सुज येणे, हिरड्यांतून रक्त, पू येणे, दात हालणे, दात पडणे, दात किडणे, मुख दुर्गंधी, थंड, गरम, तिखट खावू न देणे अशा स्वरुपातील विकार जडू शकतात. या समस्यांवरती वेळीच प्रतिबंध घातला नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. परिणामी त्यामुळे अनेक दुर्धर आजार उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मौखिक रोग जगभरातील 3.5 अब्ज लोकांना प्रभावित करीत असून ते वेदना, अस्वस्थता, विकृती आणि अगदी मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात.

दात व मुखाबाबतच्या अस्वच्छतेच्या सवयी, सतत खाण्याची सवय, विशेषता गोड पदार्थांचे सेवन या कारणांमुळे दंत क्षय होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जंक फुड, चॉकलेट, बिस्कीट, डबाबंद ज्युस यांचे सेवन टाळावे व फळे, पालेभाज्या, प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ आहारात समावेश करावा, फ्लोराईडयुक्त टुथपेस्टचा वापर करावा, दर सहा महिन्यांनी दंत रोग तज्ञांकडून दंत तपासणी करुन घ्यावी. जर सुरुवातीपासून लहान मुलांच्या दातांची पालकांनी काळजी घेतली तर भविष्यात मुख, दंत रोगांना सामोरे जावे लागणार नाही, असेही डॉ. दडपे म्हणाले.