एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

लातूर – महाराष्ट्र दिनानिमित्त येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यलय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथे रविवार, दि. 1 मे रोजी सकाळी 9 वाजता अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणीक संचालिका डॉ. सरिता मंत्री, डॉ. एन. व्ही. कुलकर्णी, डॉ. चंद्रशेखर, डॉ. टी. के. कारंडे, डॉ. अमोल डोईफोडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, प्रशासकीय अधिकारी मधुकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, डॉक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.