प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा दंत आरोग्य, फिजिओथेरपी उपचार शिबिरात 505 रुग्णांवर मोफत उपचार तर 46 जनांचे रक्तदान

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

लातूर – माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा 85 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या दंत आरोग्य शिबिरात 387 रुग्णांची व फिजीओथेरपी उपचार शिबिरात 184 रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. त्याचबरोबर 101 ज्येष्ठ नागरीक रुग्णांना संपूर्ण दातांची कवळी वाटप करण्यात आली. तर रक्तदान शिबिरात 46 जनांनी रक्तदान केले.

एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या वतीने डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे व प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप प्राचार्य यतिशकुमार जोशी, रक्त संक्रमन अधिकारी डॉ. मिना सोनवणे, विभाग प्रमुख डॉ. महेश दडपे, प्रशासकीय अधिकारी बी.बी. सुर्यवंशी, अजय तिवारी, ज्ञानोबा केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात 46 रक्तदात्यांनी रक्तदान करुन डॉ. कराड यांचा वाढदिवस साजरा केला.

एमआयडीएसआर दंत रुग्णालयाच्या वतीने लातूर येथील कॉईल नगर येथे घेण्यात आलेल्या मोफत दंत आरोग्य शिबिरात 224 रुग्णांची तपासणी करुन उपचार कण्यात आले. तसेच या सर्व रुग्णांना टूथब्रश व टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. या शिबिरात दंत रोग तज्ञ डॉ. श्वेता खरटमोल, डॉ. सावल काला, डॉ. अश्विनी पैठणे, डॉ. यश चांडक, डॉ. आनंद सोनटक्के, डॉ. ऋत्विक खांडरे व परमेश्वर सोनवणे, प्रशांत कोरे यांनी सेवा बजावली.

लातूर तालुक्यातील बोरवटी येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा येथे मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात दंत रोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ गित्ते, डॉ. कामेश भामरे, डॉ. ऋतुजा कोठावळे, डॉ. नेहल सारडा व डॉ. अनामीका सुर्यवंशी यांनी मुख - दंत रोग, हिरड्या व त्यासबंधी आजार, दातांना लागलेली किड, वेडेवाकडे दात अशा 97 रूग्णांची दंत रोग तपासणी करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच दंत आरोग्य कसे राखावे, दंत रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, अपघातानंतर दातांची घ्यावयाची काळजी आदी विषयी डॉ. सोमनाथ गित्ते माहिती दिली.

तसेच एमआयडीएसआर दंत रुग्णालयात वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये कृत्रिम दंत रोपण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे यांच्या हस्ते 101 ज्येष्ठ नागरीक रुग्णांना संपूर्ण दातांची कवळी वाटप करुन त्याचा वापर, स्वच्छता व दात नसलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध विविध उपचार पध्दती या विषयी माहिती दिली. यावेळी उप प्राचार्य यतिशकुमार जोशी, विभाग प्रमुख डॉ. सुसेन गाजरे, डॉ. शशी पाटील, डॉ. शिरिष पवार, डॉ. शितल वाघ, डॉ. योगेश नागरगोजे, डॉ. विद्या वायबसे, डॉ. प्रनोती चिंचनसुरे, डॉ. शिवानी राऊत हे उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाल दंतरोग विभागच्या वतीने बाल मौखिक आरोग्य योजनेचा शुभारंभ प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक बाल दंत रुग्ण व प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, बाल दंत रोग विभाग प्रमुख डॉ. महेश दडपे, डॉ. श्रीकांत केंद्रे, डॉ. स्फुर्ती जोशी, डॉ. प्राजक्ता गायकवाड, डॉ. प्रियंका मुंडे, कार्यक्रम समन्वयक ज्ञानोबा केंद्रे आदी उपस्थित होते.

डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय येथे मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, मणक्याचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, हातापायांना मुंग्या येणे, मार लागलेले खेळाडू अशा विविध आजारांच्या 184 रुग्णांवर फिजिओथेरपी तज्ज्ञांकडून विविध प्रकारचे फिजिओथेरपी उपचार करण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील कामाची, बसण्याची योग्य पद्धत, निरोगी जिवनशैली या विषयी उपस्थित रूग्णांना माहिती देण्यात आली.

या शिबिरास प्राचार्या डॉ. सुभाष खत्री, डॉ. सिंगार वेलन, डॉ. गौरव भटनागर, डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ. रिषा कांबळे, डॉ. पवन कुमार, डॉ. शितल घुले, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. मोहम्म्द झिशान, डॉ. सलीम शेख, डॉ. प्रमोद गायसमुद्रे, डॉ. अनिल साठे, डॉ. स्मिता मुंडे यांनी सेवा बजावली.