महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट साठी एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयातील डॉ. ऋतुजा अंबुलगेकर, डॉ. स्नेहल गावडे यांची निवड

लातूर येथील एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयातील एम.पी.टी.एच. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी डॉ. ऋतुजा नागोराव अंबुलगेकर व डॉ. स्नेहल दिनकर गावडे यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) यांच्या शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट 2024-25 (STRG) या संशोधन कार्यासाठी नुकतीच निवड झाली आहे. राज्यातील शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतून सदरील संशोधनासाठी ही निवड झाली आहे.

गेल्या एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट 2024-25 (STRG) या संशोधन कार्यासाठी राज्यभरातील बी.पी.टी.एच. व एम.पी.टी.एच. फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यामध्ये एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. यामध्ये 25 पैकी एम.पी.टी.एच. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी डॉ. ऋतुजा अंबुलगेकर व डॉ. स्नेहल गावडे या विद्यार्थीनीच्या प्रस्तावाची निवड करण्यात आली आहे.

या मध्ये "सक्रिय मुक्तता तंत्र आणि गतिशील ताणण्याच्या तंत्राचा वरच्या मान आणि खांद्यामधील त्रिकोणी स्नायूवरील वेदना, हालचालींची श्रेणी आणि मानदुखीतील अक्षमतेवर होणाऱ्या परिणामांची तुलनाः नियंत्रीत व सरळपणे निवडलेली चाचणी" या विषयावर डॉ. ऋतुजा अंबुलगेकर तर "स्पास्टिक डायप्लेजिक सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांमध्ये संतुलनावर वेस्टिब्युलर व्यायाम कार्यक्रम आणि कार्य-केंद्रित प्रशिक्षणाचा परिणाम: एक तुलनात्मक अभ्यास" या विषयावर डॉ. स्नेहल गावडे संशोधन करणार आहेत.

येत्या सप्टेंबर 2026 पर्यंत सदरील संशोधन पुर्ण करुन ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर करावयाचे आहे. या संशोधन कार्यासाठी एमयुएचएसकडून प्रत्येकी सहा व चार हजार एवढे विद्यावेतन मिळणार आहे.

या निवडीबद्दल डॉ. ऋतुजा अंबुलगेकर व डॉ. स्नेहल गावडे यांचे एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, मार्गदर्शक डॉ. रिशा कांबळे, डॉ. पराग नारायणकर, विभाग प्रमुख डॉ. गौरव भटनागर, डॉ. सिंगारा वेलन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांतून अभिनंदन होत आहे.