एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात जागतिक दंत व्यगोपचार आरोग्य दिन उत्साहात साजरा
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात जागतिक दंत व्यगोपचार आरोग्य दिन उत्साहात साजरा
लातूर – येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत व्यंगोपचार विभाग येथे बुधवारी जागतिक दंत व्यगोपचार आरोग्य दिनानिमीत्त पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सुंदर हास्य स्पर्धा, सोशल मिडीया रिल, ट्रेझर हंट अशा विविध स्पर्धा घेवून जागतिक दंत व्यगोपचार आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
जागतिक दंत व्यगोपचार आरोग्य दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. अनिता काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. विजयालक्ष्मी माले, डॉ. गौरी उगले, डॉ. सुसेन गाजरे, कार्यालयीन अधिक्षक बळीराम हांडगे, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. प्रविण मरुरे, डॉ. सतीश कुमार जोशी, डॉ. चैतन्य खानापूरे, डॉ. शिल्पा केंद्रे, डॉ. सुजित झाडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दंत व्यगोपचार या विषयी जागृतीपर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉ. उर्जीता कोल्हे व व्दितीय वैष्णवी डोंगरकर, रांगोळी स्पर्धेत प्रथम वैष्णवी जगताप व व्दितीय श्रध्दा पंचगले, साक्षी सोनवणे व प्राजक्ता पाटील, शिवानी शिरुरे, अनुष्का लाखे, सुंदर हास्य स्पर्धेत प्रथम रोहिनी थोरात, व्दितीय डॉ. तृप्ती नखाते, सोशल मिडीया रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री पाठक व सहकारी तर व्दितीय क्रमांक जास्मीन फरास व सहकारी यांनी पटकावला.
त्याचबरोबर ब्रेसेस फास्ट लायगेशन स्पर्धेत पदव्युत्तर विद्यार्थ्यां मध्ये डॉ. स्मीता वरपे व शिक्षकांमधून डॉ. यतीशकुमार जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. करेक्ट ब्रॅकेट सिक्वेन्स ॲडेन्टिफिकेशन स्पर्धेत डॉ. शिल्पा केंद्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या ट्रेझर हंट स्पर्धेत पदव्युत्तरचे विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दंत व्यगोपचार विभाग प्रमुख डॉ. सुरेश कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. महेश चौरे, डॉ. स्मिता वरपे, डॉ. श्रुती चांडक, डॉ. अंकीता जायभाये, डॉ. ज्योत्सना चाटे, डॉ. सायली देशमुख, डॉ. तृप्ती नखाते, डॉ. पायल भुतडा, डॉ. स्वाती लक्ष्मी, परिचारीका मुद्रीका सांगळे, विश्रांती सिरसाट, तंत्रज्ञ राहुल धुमाळ, लिपीक बळीराम जाधव, सेवक नयुम शेख यांनी परिश्रम घेतले.