आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी येथे 57 जनांचे रक्तदान

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी येथे 57 जनांचे रक्तदान

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त  श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी येथे 57 जनांचे रक्तदान

लातूर - येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील नर्सिंग विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमीत्त गुरुवार, दि. 12 मे रोजी श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 57 जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक तथा महिला आरोग्य आणि कुटूंब कल्याण समन्वयक डॉ. वर्षा सौरभ कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, प्रशासकीय व शैक्षणिक संचालीका डॉ. सरिता मंत्री, रक्तपेढी प्रमुख डॉ. मिना सोनवणे, नर्सिंग अधीक्षक एस्तर जोसफ, रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. प्रतिक फड, प्रशासकीय अधिकारी शंकर ससाने, सतर्कता अधिकारी सतीश बाभळसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमीत्त नर्सिंग विभागाच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील परिचारीका, इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरात रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मिना सोनवणे, डॉ. प्रतिक फड, तंत्रज्ञ गोविंद गिराम, गुणवंत सुतार, सुरेखा बिराजदार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुवार्ता घागरे, परिचारीका सारिका कांबळे, प्रेमकांत पुजारी, लिपीक मंगल मुंडे, अच्युत पाटील, सेवक दयानंद कांबळे यांनी काम पाहिले.