ओरल पॅथॉलॉजीव्दारे मौखिक रोगांचे अचूक निदान डॉ. अनुजा मनियार; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात ओरल पॅथॉलॉजी दिन साजरा

ओरल पॅथॉलॉजीव्दारे मौखिक रोगांचे अचूक निदान डॉ. अनुजा मनियार; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात ओरल पॅथॉलॉजी दिन साजरा

ओरल पॅथॉलॉजीव्दारे मौखिक रोगांचे अचूक निदान डॉ. अनुजा मनियार; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात ओरल पॅथॉलॉजी दिन साजरा

लातूर – मुख हा प्रत्येकासाठी महत्वाचा अवयव असून मुख आणि दात निरोगी असतील तर शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मुखातील दात, हिरड्या, हाडे, सांधे, ग्रंथी, त्वचा आणि मुखाभोवतील स्नायूं यांना विकार जडल्यास तोंडी रोगनिदान शास्त्र (Oral Pathology) या शाखेतील तज्ज्ञांकडून विविध चाचण्याव्दारे रोगांचे अचूक निदान केले जाते. मुख - दंत रोगाचे अचूक निदान केल्याने रुग्णास वेळेत उपचार देवून आजार बरा करता येतो, असे प्रतिपादन एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील तोंडी रोगनिदान शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनुजा मनियार यांनी केले.

येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील ओरल पॅथॉलॉजी विभाग येथे डॉ. एच. एम. ढोलकीया यांची जयंती व राष्ट्रीय ओरल पॅथोलॉजी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. अनुजा मनियार बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, डॉ. वर्षा सांगळे, डॉ. स्मिता चावरे, डॉ. विजयालक्ष्मी, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. शिल्पा बिक्कड, डॉ. प्रिया लहाने, डॉ. गौरी उगीले, डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. रिचा पंढरीकर यांची उपस्थिती होती.

ओरल पॅथॉलॉजी या शाखेव्दारे विविध प्रकारच्या चाचण्यांच्या माध्यमातून मुख व दंत रोगांचे निदान करता येते. मासाचा तुकडा, पेशी विज्ञान व रक्ताची तपासणी करुन रोगाचे निदान केले जाते असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. अनुजा मनियार म्हणाल्या की, नियमित तपासणी, योग्य निदान आणि वेळेत उपचार ही त्रिसुत्री अमलात आणून रुग्णावर वेळेत उपचार केले जातात. ओरल पॅथॉलॉजी दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतून ओरल पॅथॉलॉजी या विषयी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रीय ओरल पॅथॉलॉजी दिनानिमीत्त ‘स्पीन द व्हील’ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बी. डी. एस. तृतीय वर्षातील 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या मध्ये दानिया बक्श प्रथम तर हाजरा शेख हिने व्दितीय क्रमांक पटकावला. परिक्षक म्हणून डॉ. वर्षा सांगळे, स्मिता चावरे यांनी काम पाहिले. तसेच ‘सोप कार्वींग’ या स्पर्धेत 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात अमृता तकसाळे प्रथम तर अमृता कांबळे हिने व्दितीय क्रमांक मिळवला. परिक्षक म्हणून डॉ. विजयालक्ष्मी, डॉ. अमोल डोईफोडे यांनी काम पाहिले.

पिक्टोप्लासिया या विषयावरील पोस्टर स्पर्धेत 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये आदीती दर्डा, अंकिता भिंगोले, अक्षदा धस, महेश कापरे या गटाने प्रथम तर वेदिका जोगदंड, केतकी कुंभार, ऐश्वर्या स्वामी, स्वेता देशमुख या गटाने व्दितीय क्रमांक पटकावला. परिक्षक म्हणून डॉ. शिल्पा बिक्कड, डॉ. प्रिया लहाने, डॉ. गौरी उगीले यांनी काम पाहिले तर फेस पेंटिग या स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी सहभा्ग घेतला. या मध्ये अपर्णा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. परिक्षक म्हणून डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. रिचा पंढरीकर यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतरवासिता सायली मोरे, कैलास मालशेटवार, चैताली लोढा, राषी लटपटे, अंजली म्हेत्रे, तृप्ती गायके, श्रुती देशमुख, तंत्रज्ञ समद शेख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.