जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आज मोफत काचबिंदू तपासणी शिबिर

जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आज मोफत काचबिंदू तपासणी शिबिर

जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त  यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आज मोफत काचबिंदू तपासणी शिबिर

लातूर - जागतिक काचबिंदू सप्ताहानिमीत्त येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील नेत्ररोग विभागाच्या वतीने शनिवार, दि. 12 मार्च रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत मोफत काचबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

काचबिंदूमुळे येणारे अंधत्व आणि दृष्टीदोष या विषयी समाजात जागृती व्हावी म्हणून 6 ते 12 मार्च या कालावधीत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून घेण्यात येणाऱ्या काचबिंदू तपासणी शिबिरात नेत्र तपासणी, डोळ्यांच्या आतील दाब, मागच्या पडद्याची तपासणी बुबुळाची स्थिती यांची तपासणी करुन काचबिंदूचे निदान करण्यात येणार आहे.

डोळ्यात वाढलेला दाब, अनुवांशिकता, मधुमेह, डोळ्यांना मार लागणे, 40 शी च्या पुढे वाढत जाणारे वय या कारणांमुळे काचबिंदू होतो. अशी लक्षणे अथवा पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांनी मोफत काचबिंदू तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी केले आहे.