आजादी का अमृत महोत्सव निमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या वतीने जीवन विकास प्रतिष्ठान येथे 113 विशेष खेळाडूंची मोफत दंत आरोग्य तपासणी
आजादी का अमृत महोत्सव निमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या वतीने जीवन विकास प्रतिष्ठान येथे 113 विशेष खेळाडूंची मोफत दंत आरोग्य तपासणी
लातूर – आजादी का अमृत महोत्सव निमित्त स्पेशल ऑलम्पिक भारत व एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन विकास प्रतिष्ठान, लातूर येथे गुरुवार, दि. 7 एप्रिल रोजी मोफत दंतरोग व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 113 विशेष खेळाडूंची मोफत आरोग्य व दंत रोग तपासणी करण्यात आली.
आजादी का अमृत महोत्सव निमित्त स्पेशल ऑलम्पिक भारत या संघटनेच्या वतीने भारतातील 75 शहरातील 75 हजार स्पेशल ॲथिलिट्सची आरोग्य, दंत तपासणीचे उदिष्ठ ठेवण्यात आले होते. या मध्ये लातूर शहराची निवड करण्यात अली होती. त्यानुसार एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या वतीने जीवन विकास प्रतिष्ठान येथे घेण्यात आलेल्या आरोग्य व दंत तपासणी शिबिरात विविध वयोगटातील 113 स्पेशल ॲथिलिट्सची आरोग्य व दंतरोग तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन कण्यात आले. स्पेशल ऑलिम्पिक भारत या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड मध्ये नोंद झाली आहे.
या शिबिरात दंत रोग तज्ज्ञ डॉ. महेश दडपे, डॉ. यतिश कुमार जोशी, डॉ. भागवत केंद्रे, डॉ. श्रावनी माणकर, डॉ. आशुतोष आग्रवाल, डॉ. सुरभी पाटील, डॉ. निकिता पालकर, डॉ. पायल भुतडा, डॉ. तृप्ती नखाते, डॉ. स्वाती लक्ष्मी नायर, डॉ. भाग्यश्री चव्हाण, डॉ. जयश्री घुगे, डॉ. शिवानी राऊत व अंतरवाशिता डॉ. ऱ्हिषीकेश सुगावे, योगेश सुर्यवंशी, स्वाती सुर्यवंशी, श्रेया स्वामी, प्राजक्ता शिंदे, नेहा सोमानी, मंदार जोशी, वैष्णवी गिराम, गौरी गट्टानी, दिपाली जाधवर, आकांशा काशेटवार यांनी सेवा बजावली. या शिबिराचा लातूर जिल्ह्यातील विविध दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.