लसीकरणामुळे बालकास गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते डॉ. सरिता मंत्री - एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लसिकरण सप्ताह साजरा

लसीकरणामुळे बालकास गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते डॉ. सरिता मंत्री; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लसिकरण सप्ताह साजरा

लसीकरणामुळे बालकास गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते  डॉ. सरिता मंत्री - एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लसिकरण सप्ताह साजरा

लातूर – लसीकरण हा बालकाचा मुलभूत हक्क असून प्रत्येक बालकाचे लसीकरण करुन घेणे ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. जन्मापासून ते वयाच्या 15 वर्षापर्यंत मुलांचे पुर्ण लसीकरण केल्यास त्यांना 20 पेक्षा अधिक विविध गंभीर आजारापासून संरक्षण मिळते. त्यामुळे वेळापत्रकानुसार प्रत्येक बालकाचे लसीकरण करा, असे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय व शैक्षणीक संचालिका डॉ. सरिता मंत्री यांनी केले.

येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वतीने जागतिक लसिकरण सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. सरिता मंत्री अध्यक्षीय समारोपात बोलत होत्या. या कार्यक्रमास बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे, डॉ. दत्तात्रय कुलकर्णी, डॉ. शिल्पा दडगे, डॉ. दिपीका भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. सरिता मंत्री म्हणाल्या की, मुलांच्या आयुष्याचा पाया बाल वयात रोवला जात असून त्यात लसिकरणाची भूमिका महत्त्वाची आहे. बालकांना दिल्या जाणाऱ्या लसीकरण बद्दल भीती बाळगु नये. कारण लसीकरणामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढून त्याचा अनेक आजारांपासून बचाव होतो. त्यासाठी डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या तारखेनुसार आपल्या बालकाचे वेळेवर लसीकरण करा. लसीकरण केल्यामुळे समुह रोगप्रतिकारशक्ती तयार होऊन लसीकरण न घेणाऱ्यांनाही त्यांचा फायदा होतो. जन्मापासून ते पाच वर्षापर्यंचे लसीकरण शासनाने पुर्णपणे मोफत उपलब्ध केलेले आहे. त्याचा बालकांच्या आरोग्यासाठी फायदा करुन घ्यावा. आपल्या देशात लसीकरणामुळेच देवी या आजाराचे समुळ उच्चाटन झालेले असल्याचे डॉ. मंत्री म्हणाल्या.

यावेळी प्रास्ताविकात बोलताना डॉ. विद्या कांदे म्हणाल्या की, लसीकरणाचे बालकास सर्वार्थाने फायदेच आहेत. सरसगट लसीकरण होण्यासाठी लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. पाच वर्षाखालील बाल मृत्यू दर कमी होण्यास लसीकरण कारणीभूत आहे. मात्र आजही काही लसी बालकांना शंभर टक्के दिल्या जात नाहीत. हे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत न्यायचे आहे. बालकांना सर्वसाधारण आजारात डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण कराता येते. त्या कारणांने लसीकरण लांबविण्याची गरज नाही. ‘दिर्घायुष्य सर्वांसाठी’ ही या वर्षीच्या लसीकरण सप्ताहाची थीम असून दिर्घायुष्यासाठी प्रत्येक बालकांचे लसीकरण करा, असे डॉ. कांदे यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना डॉ. दिपीका भोसले म्हणाल्या की, बालकाचे जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत सात वेळा लसीकरण करणे गरजेचे आहे. जन्मानंतर लागलीच पहिल्या आठवड्यात बीसीजी – क्षयरोग, पोलिओ, काविळ प्रतिबंधक या तीन लसी नवजात अर्भकास दिल्या जातात. दिड महिन्याला पेंटा 1 – डीपीटी, घटसर्प, डांग्या खोकला,धनूर्वात मेंदूज्वर, कावीळ ब या पाच आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि पोलिओ व न्यूमोकोकल 1 ही लस निमोनियासाठी इन्जेक्शव्दारे दिली जाते तर तोंडाव्दारे जुलाब प्रतिबंधक रोटावायरस 1 व पोलिओ ही लस दिली जातो. अडीच महिन्यानंतर पुन्हा पेंटा व रोटा वायरस, पोलिओचा दुसरा डोस दिला जातो. साडेतिन महिन्यांनी पुन्हा पेंटा, पोलिओ, न्यूमोकोकल इन्जेक्शव्दारे तर रोटा वायरस, पोलिओ तोंडाव्दारे दिला जातो. नऊ महिने पुर्ण झाल्यानंतर गोवर, गालफुगी, रुबेला प्रतिबंधक लस तर जेई 1 – मेंदूज्वर, विटामिन ए 1, न्यूमोकोकल बूस्टर डोस दिला जातो. 16 ते 24 महिन्याच्या कालावधीत डीपीटी बूस्टर, एमएमआर 2, जेई 2, ओपीव्ही व विटामिन ए 2 ही लस दिली जाते. पाच वर्षापर्यंत दर सहा महिन्यांनी विटामिन ए चा डोस दिला जातो. डीपीटी बूस्टर 5 ते 6 वर्ष कालावधित, टीटी / डीटी 10 वर्ष तर टीटी / डीटी चा डोस 16 वर्षाला दिला जातो. या प्रमाणे बालकाचे लसीकरण केल्यास त्याचे विविध आजारांपासून संरक्षण होते. शासनाने निर्धारित केलेल्या लसी शिवाय कांजण्या, काविळ अ, टायफॉईड, एचपीव्ही, फ्यु या ऐच्छिक लसी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या वेळी घ्याव्यात, असे डॉ. भोसले यांनी सांगीतले.

यावेळी जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लसीकरण या विषयी महिती असलेले पोस्टर सादर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोनल रे, डॉ. अपर्णा आस्था, डॉ. स्नेहल सोनकांबळे, परिचारीका शाकिरा हिप्परगे, कविता येरमाळे, लिपीक किरण साबळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अखिलेश अंजान यांनी केले तर आभार डॉ. शिल्पा दडगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी गरोदर माता, प्रसुती माता, बालक व नातेवाईक उपस्थित होते.