हिरड्या निरोगी असतील तर दात दिर्घकाळ टिकतात डॉ. राघवेंद्र मैत्री

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात हिरडी आरोग्य दिन साजरा

हिरड्या निरोगी असतील तर दात दिर्घकाळ टिकतात  डॉ. राघवेंद्र मैत्री

लातूर – दात आणि हिरडी हे एकमेकांशी निगडीत अवयव आहेत. मुख स्वच्छतेकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास हिरड्यांना सुज येणे, हिरड्यांतून रक्त, पू येणे, दात हालणे, दात पडणे व दात किडणे अशा स्वरूपातील विकार जडू जडतात. हिरड्यांचे आजार बळावल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. त्यासाठी नियमितपणे दात आणि हिरड्यांची स्वच्छता करणे आवश्यक असून हिरड्या निरोगी असतील तर दात दिर्घकाळ टिकतात, असे प्रतिपादन दंत परिवेष्ठन तज्ज्ञ डॉ. राघवेंद्र मैत्री यांनी केले.

येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत परिवेष्ठन विभागात हिरडी आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. राघवेंद्र मैत्री बोलत होते. या वेळी दंत परिवेष्ठन विभाग प्रमुख डॉ. विष्णुदास भंडारे, प्रा. डॉ. अनिता काळे, बाल दंतरोग विभाग प्रमुख डॉ. योगेश काळे, कराड येथील कृष्णा दंत महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. समिर झोपे, मुंबई येथील वायएमटी दंत महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. तुषार पाठक, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. गौरी उगले, कार्यालयीन अधिक्षक बळीराम हांडगे, डॉ. राघवेंद्र मैत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. राघवेंद्र मैत्री म्हणाले की, लहान मुलांमध्ये हिरडीचे आजार होण्याची 99 टक्के शक्यता असते तर प्रोढांमध्ये 78 टक्के शक्यता असते. हिरडी रोग मुख्यता दातांवर बसलेले किटन व ब्रश व्यवस्थित न केल्याने होतो. दातांच्या आरोग्याची काळजी घेत असताना हिरड्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवढ्या हिरड्या मजबूत असतील तेवढे दात मजबूत राहतात. दात कितीही चांगले असले तरी हिरड्या खराब असतील दात खराब होतात. त्यासाठी दररोज सकाळी व झोपण्यापूर्वी योग्य पध्दतीने ब्रशने दात स्वच्छ करावेत. नियमित दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी, मुखरोग उद्भवल्यास दंतरोग तज्ज्ञांकडून त्वरित उपचार घ्यावेत, तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे असे डॉ. मैत्री यांनी सांगीतले.

यावेळी ‘पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट अ मॅजिकल पाथवे टू सबसिड’ या विषयावर बोलताना डॉ. विष्णुदास भंडारी म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. तसेच व्यक्तीमत्व विकासासाठी सबंधीत विषयाचे वाचन करुन ज्ञान आत्मसात करावे. जेणेकरून रुग्ण – नातेवाईकांशी संवाद साधन्याची कला आत्मसात होऊन व्यक्तीगत प्रगतीसाठी मदत होईल. 

या वेळी दंत परिवेष्ठन या विषयावर प्रश्नमंजुषा व रिल मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवनितकुमार शंतुलवार तर रिल मेकिंग स्पर्धेत प्रणीता कदम यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. या प्रसंगी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. खुशबु बेझलवार, डॉ. प्रियंका जाधव, डॉ. शितल नगिमे, डॉ. पुनम कांदे, डॉ. अनुषा मठ, डॉ. अशुतोष अग्रवाल, डॉ. निकीता पालकर, डॉ. सुरभी पाटील व नविनकुमार शंतुलवार, रोहित पोकलवार, सुरज पिनाटे, सदानंद मुळे, किर्ती सेलुकर, भावना शिंदे यांनी परिश्रम घेतले.