डॉ. हनुमंत कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा दंत आरोग्य, फिजिओथेरपी शिबिरात 340 रुग्णांवर मोफत उपचार तर 56 जनांनी केले रक्तदान

डॉ. हनुमंत कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा दंत आरोग्य, फिजिओथेरपी शिबिरात 340 रुग्णांवर मोफत उपचार तर 56 जनांनी केले रक्तदान

डॉ. हनुमंत कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा  दंत आरोग्य, फिजिओथेरपी शिबिरात 340 रुग्णांवर मोफत उपचार तर 56 जनांनी केले रक्तदान

लातूर – येथील माईर्स एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांचा 68 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या दंत आरोग्य शिबिरात 211 रुग्णांची व फिजीओथेरपी उपचार शिबिरात 129 रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. त्याचबरोबर डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

डॉ. हनुमंत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख शल्य विभाग व श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, रक्त संक्रमन अधिकारी डॉ. मिना सोनवणे, डॉ. महेश दडपे, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. व्यंकटेश हंगे, प्रशासकीय अधिकारी बी.बी. सुर्यवंशी, ज्ञानोबा केंद्रे, दयानंद कुलकर्णी, श्रीधर घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान करुन डॉ. कराड यांचा वाढदिवस साजरा केला.

तसेच एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लातूर तालुक्यातील कासारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत दंत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात दंत रोग तज्ज्ञांकडून मुख व दंत रोग, हिरड्या व त्यासबंधी आजार, दातांना लागलेली किड, दुधाचे न पडलेले दात व वेडेवाकडे दात अशा 151 शालेय विद्यार्थ्यांच्या दंत रोगाची तपासणी करुन प्राथमिक समुपदेशन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टूथब्रश व पेस्टचे वाटप करण्यात आले. या शिबिरास मुख्याध्यापक व्यंकटेश शिवणे, दंत रोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ गित्ते व डॉ. मानसी बक्कड, डॉ. वैदेही धमाळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या निकिता जाधव यांची उपस्थिती होती.

दातांची निगा कशी राखावी, दुधाच्या दातांचे महत्व, दंत रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, अपघातानंतर दातांची घ्यावयाची काळजी, लहान मुलांना उद्भवणारे वेगवेगळे दंत रोग, दंत रोग जडल्यानंतर घ्यावयाचे उपचार व काळजी या विषयी दंत रोग तज्ञ डॉ. सोमनाथ गित्ते यांनी विस्तृत माहिती दिली.

त्याचबरोबर औसा तालुक्यातील बुधोडा येथील स्वाधार अंध अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र येथे मोफत दंत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 60 अंध – अपंग रुग्णांनी दंत आरोग्य तपासणी करुन दंत आरोग्य राखण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कराड यांच्या वाढदीवसानिमित्त येथील अंध – अंपंग व्यक्तींना फळांचे वाटपही करण्यात आले. या शिबिरास संचालक हरिश्चंद्र सुडे, दंत रोग तज्ञ डॉ. प्रकाश कसबे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते रोहित पवार हे उपस्थित होते.

तसेच डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील मातोश्री वृध्दाश्रम येथील ज्येष्ठ नागरीकांना स्नेहभोजन देण्यात आले.

डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय येथे मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, मणक्याचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, हातापायांना मुंग्या येणे, मार लागलेले खेळाडू अशा विविध आजारांच्या 129 रुग्णांवर फिजिओथेरपी तज्ज्ञांकडून विविध प्रकारच्या व्यायामाव्दारे उपचार करण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील कामाची, बसण्याची योग्य पद्धत, निरोगी जिवनशैली या विषयी उपस्थित रूग्णांना माहिती देण्यात आली. या शिबिरात फिजिओथेरपी तज्ञ डॉ. रिषा कांबळे, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. मोहम्म्द झिशान, डॉ. सलीम शेख, डॉ. अनिल साठे यांनी सेवा बजावली.

डॉ. हनुमंत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील माईर एमआयटी शिक्षण संकुल येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय, एमआयएनएस निर्सिंग, एमआयओ ऑप्टोमेट्री महाविद्यालय व मुकूंदराज आणि श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, रुग्ण, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील हितचिंतक व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या.