एमआयटी शिक्षण संकुलात ‘आरंभ २०२५’ क्रीडा संमेलनाचे आयोजन कार्यकारी संचालक प्रा. तेजस कराड यांची माहिती; १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार भव्य क्रीडा स्पर्धा

एमआयटी शिक्षण संकुलात ‘आरंभ २०२५’ क्रीडा संमेलनाचे आयोजन कार्यकारी संचालक प्रा. तेजस कराड यांची माहिती; १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार भव्य क्रीडा स्पर्धा

एमआयटी शिक्षण संकुलात ‘आरंभ २०२५’ क्रीडा संमेलनाचे आयोजन  कार्यकारी संचालक प्रा. तेजस कराड यांची माहिती; १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार भव्य क्रीडा स्पर्धा

लातूर, – येथील माईर एमआयटी शिक्षण संकुल येथे दि. १० मार्च ते एप्रिल या कालावधीत विश्व मैदान येथेआरंभ २०२५या आंतर महाविद्यालयीन क्रीडा संमेनलाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक प्रा. तेजस हनुमंत कराड यांनी दिली.

येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय, एमआयओ ऑप्टोमेट्री महाविद्यालय आणि प्रयाग नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितआरंभ २०२५या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सोमवार, दि. १० मार्च रोजी विश्व मैदान येथे सायंकाळी 4 वाजता कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते होणार आहे. या क्रीडा संमेलनात इनडोअर आऊटडोअर अशा एकूण १२ खेळांचे सामने रंगणार आहेत.

दि. १० मार्च रोजी बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या खेळांनी संमेलनाची सुरुवात होणार आहे. ११ मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता इंटरहाऊस संघात क्रिकेट आणि बॅडमिंटनचे सामने होतील, त्यामध्ये प्रत्येकी एक मुलींचा आणि एक मुलांचा सामना खेळवला जाणार आहे. १२ मार्च रोजीही संध्याकाळी वाजता क्रिकेट आणि बॅडमिंटनचे सामने होणार आहेत.

दि. १३ मार्च रोजी संध्याकाळी वाजता क्रिकेट आणि बॅडमिंटनचे सामने होणार असून प्रत्येकी एक मुलींचा एक मुलांचा सामना खेळवला जाईल. १४ आणि १५ मार्चलाही संध्याकाळी वाजता क्रिकेटचे सामने होतील. दि. १६ मार्च रोजी संध्याकाळी वाजता कबड्डी आणि व्हॉलीबॉलचे सामने होणार आहेत. १७ मार्च रोजी संध्याकाळी वाजता कबड्डी आणि थ्रोबॉल स्पर्धा पार पडतील. १८ मार्च रोजी खो-खो, व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉल या खेळांचे अंतिम सामने संध्याकाळी वाजता होणार आहेत.

त्यानंतर दि. २० मार्च रोजी संध्याकाळी वाजता क्रिकेटचे सामने होतील. २१ मार्च रोजी फुटबॉलचे दोन सामने होणार आहेत २२ मार्चला खो-खोचे अंतिम सामने तर २३ मार्च रोजी कबड्डीच्या अंतिम लढती खेळवल्या जातील. तसेच २४ मार्च रोजी फुटबॉलचा अंतिम सामना पार पडेल, तर २५ मार्च रोजी क्रिकेटचे अंतिम सामने होणार आहेत. २६ मार्च रोजी संमेलनाचा समारोप पारितोषिक वितरण विजयी संघ जाहीर करुन करण्यात येईल.

आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

विविध खेळातील इंटरहाऊस मधील विजयी संघात दि. ३१ मार्च रोजी पासून आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा होणार असून सकाळी :३० वाजता क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ होईल. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल. संध्याकाळी वाजता व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉलचे सामने होणार आहेत. दि. एप्रिल रोजी सकाळी :३० वाजता फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होईल. संध्याकाळी वाजता खो-खो, व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉलचे सामने खेळले जातील.

दि. एप्रिल रोजी सकाळी :३० वाजता कबड्डी आणि खो-खो चे उपांत्य फेरीचे सामने होतील. संध्याकाळी वाजता या दोन्ही खेळांचे अंतिम सामने पार पडतील. त्यानंतर रात्री वाजता बॅडमिंटन स्पर्धा होईल. तर दि. एप्रिल रोजी सकाळी :३० वाजता क्रिकेटचा अंतिम सामना होईल. संध्याकाळी वाजता ऍथलेटिक्स स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप होणार आहे.