चालत्या-फिरत्या मोबाईल व्हॅन क्लिनिकव्दारे रुग्णांना घरपोहोच दातांचे आणि फिजिओथेरपी उपचार मिळतील डॉ. हनुमंत कराड यांचा विश्वास; डेंटल व फिजिओथेरपी मोबाईल व्हॅनचे अनावरण

चालत्या-फिरत्या मोबाईल व्हॅन क्लिनिकव्दारे रुग्णांना घरपोहोच दातांचे आणि फिजिओथेरपी उपचार मिळतील. डॉ. हनुमंत कराड यांचा विश्वास; डेंटल व फिजिओथेरपी मोबाईल व्हॅनचे अनावरण

चालत्या-फिरत्या मोबाईल व्हॅन क्लिनिकव्दारे रुग्णांना  घरपोहोच दातांचे आणि फिजिओथेरपी उपचार मिळतील     डॉ. हनुमंत कराड यांचा विश्वास; डेंटल व फिजिओथेरपी मोबाईल व्हॅनचे अनावरण

लातूर – शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या दारात दंत रोगांवर आणि विविध आजारांवर फिजिओथेरपी उपचार घेता यावेत यासाठी दोन चालत्या-फिरत्या मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक व सुसज्ज अशा चालत्या-फिरत्या मोबाईल व्हॅन क्लिनिक व्दारे ‍लातूर शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांना दंत रोग व फिजिओथेरपी उपचार हे घरपोच दिले जातील, असा विश्वास एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी व्यक्त केला.

माईर एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या चालत्या-फिरत्या मोबाईल व्हॅन क्लिनिकचे अनावरण डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. कराड बोलत होते. यावेळी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, मुख शल्य तज्ञ डॉ. अमोल डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात शिबिराच्या माध्यमातून दंत आरोग्य व फिजिओथेरपी उपचार सेवा देवून हजारो रुग्णांना व्याधीमुक्त करण्यात आले आहे. या सेवेची व्याप्ती वाढवून रुग्णांना आपल्या गावात, घरासमोर जाऊन दंत व फिजिओथेरपी उपचार हे अत्याधुनिक स्वरुपात देण्याचा मानस होता, असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, याचाच एक भाग म्हणून हे दोन मोबाईल व्हॅन क्लिनिक नागरीकांच्या सेवेत दाखल होत आहेत.

अत्याधुनिक सोयींनीयुक्त असलेल्या डेंटल मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांवर, बेडेड (चालता-फिरता न येणाऱ्या) रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन दंत रोगाचे योग्य निदान आणि प्रथमोपचार केले जातील. दात काढणे, दातांची स्वच्छता करण्याचे उपचारही केले जातील. तसेच विविध शाळांमध्ये दंत आरोग्य शिबिरे घेवून शालेय मुलांची दंत तपासणी करुन उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर फिजिओथेरपी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांकडून फिजिओथेरपी उपचार सेवा दिली जाणार आहे. मान, पाठ, कंबर, गुडघे दुखी, सांधेदुखी, अर्धांगवायू व ह्दयविकाराचे रुग्ण, ज्येष्ठ नागरीक आणि सिरेबल पाल्सी आजाराचे बाल रुग्ण, क्रीडा दुखापतींचे रुग्ण व बेडेड रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणांद्वारे फिजिओथेरपी उपचार केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातील गरजु रूग्णांपर्यंत दंत आरोग्य आणि फिजिओथेरपी उपचार सेवा पोहचविण्याचा प्रयत्न या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून करणार असल्याचे डॉ. हनुमंत कराड यांनी सांगीतले.

यावेळी डेंटल व्हॅनचे पूजन उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी यांनी केले तर फिजिओथेरपी व्हॅनचे पूजन प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल ज्ञानोबा केंद्रे यांनी करुन शेवटी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.