दातांचे आणि सामान्य आरोग्य निरोगी राखण्यासाठी सॅटेलाईट क्लिनिक मदतीचे ठरतील

दातांचे आणि सामान्य आरोग्य निरोगी राखण्यासाठी सॅटेलाईट क्लिनिक मदतीचे ठरतील डॉ. हनुमंत कराड यांचे मत; डी. एस. कराड दंत चिकित्सालय, फिजिओथेरपी क्लिनिकचा शुभारंभ

दातांचे आणि सामान्य आरोग्य निरोगी  राखण्यासाठी सॅटेलाईट क्लिनिक मदतीचे ठरतील

लातूर शहरातील नागरीकांना दंत रोग व फिजिओथेरपी उपचार सेवा परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी डी. एस. कराड दंत चिकित्सालय आणि फिजिओथेरपी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. लोकांचे दंत आरोग्य आणि सामान्य आरोग्य निरोगी राखण्यासाठी हे दोन्ही सॅटेलाईट क्लिनिक मदतीचे ठरतील, असा विश्वास कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी व्यक्त केला.

माईर एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय व नेत्र प्रतिष्ठान संचलित डी. एस. कराड दंत चिकित्सालय, फिजिओथेरपी क्लिनिक यांचा शुभारंभ आणि ‘अल्कॉन सेंचुरियन व्हिजन सिस्टिम’ या अत्याधुनिक मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया मशिनचे अनावरण डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या दिड दशकापासून एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या माध्यमातून दंत आरोग्य व फिजिओथेरपी उपचार सेवा देवून हजारो रुग्णांना व्याधीमुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लातूर शहरातील खाडगाव रोड व लातूर तालुक्यातील रुई रामेश्वर येथे यापुर्वी सुरु करण्यात आलेले सॅटेलाईट क्लिनिक लोकांसाठी सोयीचे ठरत आहेत, असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, याचाच एक भाग म्हणून लातूर शहरातील बार्शी रोड व एमआयडीसी परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी दंत चिकित्सालय, फिजिओथेरपी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.

हे सॅटेलाईट क्लिनिक सर्व अत्याधुनिक सोयींनी सज्ज असून येथील रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून योग्य व खात्रीशीर उपचार करण्यात येतील आणि जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा होईल. सर्व सामान्य आरोग्याइतकेच दंत आरोग्य महत्वाचे आहे. लोकांचे दंत आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व सामान्य आरोग्य सुदृढ राखण्यासाठी हे सॅटेलाईट क्लिनिक प्रयत्नशील राहील.

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या रूग्णांपर्यंत दंत आरोग्य आणि फिजिओथेरपी उपचार सेवा पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी जिह्यात ठिकठिकाणी सॅटेलाईट क्लिनिकच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची खात्री डॉ. कराड यांनी दिली.

समाजातील सर्व रुग्णांपर्यंत दंत आरोग्य सेवा या सॅटेलाईट क्लिनिकच्या माध्यमातून पुरवली जाईल, असे प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे यांनी सांगीतले तर व्याधीमुक्त समाज निर्मीतीसाठी फिजिओथेरपी क्लिनिक कार्यरत राहील, असे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी सांगीतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जास्मीन फरास व प्रिती चेंकाळे यांनी केले तर शेवटी आभार दंत रोग तज्ञ डॉ. सोमनाथ गित्ते यांनी मानले. या कार्यक्रमासाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय व डी. एस. कराड आय इन्स्टिट्युट येथील विभाग प्रमुख, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण व नागरीक उपस्थित होते.