महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमीत्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात वृक्षारोपण एक विद्यार्थी - एक झाड उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांवर वृक्ष संगोपनाची जबाबदारी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमीत्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात वृक्षारोपण एक विद्यार्थी - एक झाड उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांवर वृक्ष संगोपनाची जबाबदारी
लातूर, दि. 13 – माईर एमआयडीएसआर दंत महाविद्याच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 24 वा वर्धापन दिन एक विद्यार्थी, एक झाड या संकल्पनेनुसार वृक्षारोपन करुन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांच्या हस्ते एमआयडीएसआर दंत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय व शिक्षण संचालीका डॉ. सरिता मंत्री, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. अनुजा मनियार, डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. विजयालक्ष्मी माले, कार्यालय अधिक्षक बळीराम हांडगे, डॉ. गौरी उगले, डॉ. श्रीकांत केंद्रे, डॉ. प्रविण मरुरे, डॉ. भागवत केंद्रे, डॉ. सोमनाथ गित्ते, डॉ. अर्चना आपटे यांची उपस्थिती होती.
एक विद्यार्थी, एक झाड या संकल्पनेनुसार बी. डी. एस. तृतिय वर्षातील विद्यार्थी अनुजा अपेट, अजीत चव्हाण, आरती चेडे, वैष्णवी जगताप, ऐश्वर्या कदम, श्रध्दा कदम, निता काकडे, प्रिती कराड, स्नेहा कराड, वैष्णवी कटारिया, सुरज मद्रेवार, दिपाली मामदे, स्वेता मानकरी, स्नेहल मुडपे, श्रध्दा पंचगले, शुभम फोले, शिवानी राजारुपे, रंजीत शिनगारे, साक्षी सोनवणे, अदिती तोंडचीरकर, अंकिता उकीरडे, कोमल वाडेकर, शुभांगी वाघमारे, ऋतुजा शिंदे, गायत्री राऊत यांनी प्रत्येकी एका वृक्षाची लागवड करुन पुढी देखभाल व पालनपोषणाची जबाबदारी घेतली. यावेळी केवळ वृक्ष लावणेच नव्हे तर त्यांचे संगोपनही करण्याचा संपल्प करण्यात अला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंतरवासिता डॉ. स्वप्निल गोडबोले, डॉ. ज्ञानेश्वर गोपाळघरे, डॉ. दिपाली वाघमारे, डॉ. निशिगंधा येलापुरे, डॉ. आरती येदले, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अनुराधा गावडे, डॉ. गौरी गटानी, डॉ. सुरज ठोंबरे, डॉ. शिवानी तडवळकर, डॉ. श्रेया स्वामी यांनी परिश्रम घेतले.