दंतरोग तज्ज्ञ डॉ. विलास धुमाळ यांचे दुःखद निधन
दंतरोग तज्ज्ञ डॉ. विलास धुमाळ यांचे दुःखद निधन
लातूर - येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंतरोग तज्ज्ञ डॉ. विलास एकनाथराव धुमाळ (वय - ५६ वर्ष) यांचे गुरुवार, दि. १२ जानेवारी रोजी दुपारी ३.१६ वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
डॉ. धुमाळ हे सन २००८ पासून एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील सार्वजनिक दंत आरोग्य विभागात दंतरोग तज्ज्ञ तथा शिक्षक म्हणून कार्यरत होते. ग्रामीण भागात शिबिरे घेऊन दंत आरोग्य सेवा देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. डॉ. धुमाळ यांच्या अकाली निधनामुळे एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाने अनुभवी दंतरोग तज्ज्ञ गमावला असून त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. धुमाळ यांच्यावर गुरुवारी रात्री 8 वाजता मौजे हाडगा (ता. निलंगा) या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.