डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निलंगा येथे आरोग्य शिबिरात 298 रुग्णांवर मोफत उपचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निलंगा येथे आरोग्य शिबिरात 298 रुग्णांवर मोफत उपचार
लातूर – एमआयएमएसआर वैद्यकिय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर आणि संयुक्त सर्व धर्मीय सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त शनिवारी निलंगा येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विविध आजाराच्या 298 रुग्णांची तपासाणी करुन मोफत उपचार करण्यात आले.
या सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन डॉ. अरुण डावळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी जि. प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजितराव माने, दयानंद चोपणे, शिबिर प्रमुख डॉ. एम. डी. फैज, सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश रेशमे, आरपीआयचे प्रदेश सचिव विलास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत कांबळे, राकॉचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आरोग्य शिबिरात ह्रदयरोग, कर्करोग, मुत्रपिंड, मुत्राशयाचे आजार, पोटाचे विकार, नेत्ररोग, मेंदू व मज्जासंस्था विकार, स्त्रीरोग, त्वचारोग, अस्थीरोग, बालरोग, कान-नाक-घसा विकार, फुफ्फुसाचे आजार या विविध आजराच्या 298 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच दिर्घ आजाराच्या 42 रुग्णांना पुढील उपचारासाठी लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
या आरोग्य शिबिरात डॉ. एम. डी. फैज, डॉ. शुभम चौधरी, डॉ. रोहित पडताळे, डॉ. श्रुती जायभाये, डॉ. सोनल रे, डॉ. प्रषिक सिरसाट, डॉ. आर्पीता देशपांडे, डॉ. आदित्य मेटे, डॉ. प्रेम ढाकरे, डॉ. समृध्दी सुर्यवंशी, डॉ. ऋचा नळदकर, डॉ. कुणाल देशमुख, डॉ. वैभव केंद्रे, डॉ. रब्बानी शेख, डॉ. अक्षता माने, परिचारक महेश नागरगोजे, हरुण पठाण, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता गणेश कराड, प्रविण जोशी, सेवक कुंभार, ताहेर पठाण यांनी सेवा बजावली.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी, क्रांतीवीर सेनेचे गोविंद सुर्यवंशी, सेनेचे हरिभाऊ सगरे, सुनील नाईकवाडे, राकॉंचे धम्मानंद कांबळे, काँग्रेसचे अमोल सोनकांबळे यांच्यासह संयुक्त सर्व धर्मीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.