अदृश्य संरेखन तंत्रामुळे वेड्यावाकड्या दातावर उपचार करणे सुलभ
डॉ. मिलिंद दर्डा एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात दंत व्यंगोपचार कार्यशाळा
लातूर, दि.13 – लहान मुलांमध्ये अथवा तरुणांमध्ये वेडेवाकडे व पुढे आलेले दात सरळ करण्यासाठी दातांवर पीन लाऊन उपचार केले जातात मात्र आता याला पर्याय म्हणून अदृश्य संरेखन तंत्रज्ञान (Invisible Aligners Technology) हे उपचार विकसित झाले आहेत. या तंत्रज्ञानाव्दारे सहज, सुलभ आणि सौंदर्यदृष्या उपचार करता येणार असून ही अदृष्य पध्दतीची उपचार पध्दती असल्याने दातावर लावलेली ब्रेसेसही दिसून येणार नाहीत, अशी महिती पुणे येथील दंत व्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद दर्डा यांनी दिली.
येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत व्यंगोपचार विभाग व भारतीय दंत व्यंगोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 11 एप्रिल रोजी ‘क्षितिजाच्या पलीकडील दंत संरेखीत प्रक्रिया’ या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मिलिंद दर्डा बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे व महाराष्ट्र दंत परिषदेचे निरिक्षक डॉ. सतिश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उप प्राचार्य तथा दंत व्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. सुरेश कांगणे, बिदर येथील एस. बी. पाटील दंत महाविद्यालयाचे डॉ. चंद्रशेखर पाटील, नांदेड येथील दंत व्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मापारे, डॉ. आनंद आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मिलिंद दर्डा म्हणाले की, आतापर्यंत पारंपारिक दंत व्यंगोपचार पद्धतीद्वारे उपचार केले जात होते मात्र आता अदृश्य संरेखन तंत्रज्ञान ही अमेरिकेत विकसित झालेल्या अत्याधुनिक दंत व्यंगोपचार पध्दतीव्दारे भारतात गेल्या एक दशकापासून वेड्यावाकड्या दातांवर उपचार केले जात आहेत. या उपचार पद्धतीने दातावर लावलेले ब्रेसेस जेवन करतेवेळी व दातांची स्वच्छता करताना काढून ठेवता येतात, दैनंदिन आहारात पथ्य-पाणी करण्याची आवश्यकता भासत नाही व दतावरील ब्रेसेस दिसून येतही येत नाहीत. या तंत्राव्दारे मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरात उपचार उपलब्ध आहेत मात्र आता हे अत्याधुनिक उपचार एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या माध्यमातून लातूर स्थित रुग्णांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. दर्डा यांनी सांगितले.
या कार्यशाळेत दंत व्यंगोपचार विभागातील 16 पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संशोधन सादर केले. या मध्ये प्रथम क्रमांक डॉ. अंकिता जायभाये, व्दितीय डॉ. पौल सिल्वेस्टर व तृतीय क्रमांक डॉ. मधुरा वाघ हिने पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या कार्यशाळेत 35 दंत व्यंगोपचार तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी आयटेरो फाय डी प्लस एन्ट्राओरल डिजीटल स्कॅनर या मशीनच्या वापरा विषयी अलाइन टेकचे चमन पांडे व अक्षय झामरे यांनी प्रात्यक्षीकाव्दारे माहिती दिली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता जायभाये व डॉ. सायली देशमुख यांनी केले तर आभार डॉ. आनंद आंबेकर यांनी मानले. या कार्यशाळेसाठी डॉ. प्रविण मरुरे, डॉ. यतिशकुमार जोशी, डॉ. चैतन्य खानापुरे, डॉ. शिल्पा केंद्रे, डॉ. सुजित झाडके, डॉ. स्मिता वरपे, डॉ. महेश चौरे, डॉ. श्रुती चांडक, ज्योत्सना चाटे, डॉ. स्वातीलक्ष्मी नायर, डॉ. पायल भुतडा, डॉ. तृप्ती नखाते, लिपीक राहुल कराड, बळीराम जाधव, परिचारक मुद्रीका सांगळे, सेवक नयुम शेख, विश्रांती सिरसाट यांनी परिश्रम घेतले.