प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्रिडा संकुलात मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्रिडा संकुलात मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी  जिल्हा क्रिडा संकुलात मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर

लातूर - माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 11 या वेळेत डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन, जिल्हा क्रिडा संकुल, लातूर येथे सर्व वयोगटातील रुग्ण व नागरीकांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या फिजिओथेरपी उपचार शिबिरात मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, मणक्याचे आजार, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, सांधेदुखी, संधीवात, अपघातात फॅक्चर झालेले रुग्ण, ह्रदयरोग, फुफ्फुसाचे आजार, पक्षघात, अर्धांगवायू, अपघाग्रस्त मेंदू रुग्ण, विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेचे रुग्ण, मार लागलेले खेळाडू अशा विविध आजारांच्या रुग्णांवर तज्ज्ञांकडून विविध प्रकारच्या व्यायामाव्दारे फिजिओथेरपी उपचार करण्यात येणार आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांवर एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयात माफक दरात पुढील उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरीक आणि विविध आजाराचे रुग्ण यांनी आपली दिनचर्या कशी राखावी या विषयी फिजीओथेरपीचे तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.

सदरील फिजिओथेरपी उपचार शिबिराचा विविध आजाराचे रुग्ण व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड व प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव यांनी केले आहे.