फिजिशियन डॉ. बजरंग मंत्री यांचे निधन
लातूर – निष्णात फिजिशियन प्रा. डॉ. बजरंग श्रीकिशन मंत्री यांचे शुक्रवार, दि. 22 जुलै 2022 रोजी पहाटे 5 वाजता खंडोबा गल्ली येथील त्यांच्या रहात्या घरी ह्रदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते. माईर्स एमआयएमअएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या तथा प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री यांचे ते पती होते.
शुक्रवारी रात्री 8 वाजता मारवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मेडिसिन या विषयात एम.डी. तर फुफ्फुस विकार विषयात टी.डी.एस. चे शिक्षण झाले होते. त्यांनी वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक म्हणून सन 1978 ते 2019 या कालावधीत तब्बल 41 वर्ष एवढी प्रदिर्घकाळ सेवा दिलेली आहे. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आणि रुग्ण प्रिय डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.