कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड यांची किर्ती सदैव अमर राहिल बिहारचे साखर उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांची भावना; रामेश्वर रूई येथे श्रध्दांजली कार्यक्रम

कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड यांची किर्ती सदैव अमर राहिल बिहारचे साखर उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांची भावना; रामेश्वर रूई येथे श्रध्दांजली कार्यक्रम

लातूर - “जीवनाबरोबरच मृत्यू अटळ असतो हे सत्य आहे. परंतू उर्मिला काकूंच्या जाण्याने त्यांची किर्ती कधीही कमी होणार नाही. त्यांच्याकडे जीवन जगण्याची शैली असल्याने त्यांची किर्ती सदैव अमर राहिल. आज संपूर्ण बिहार राज्य सरकारकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पीत करतो.” अशी भावना  बिहारचे साखर उद्योग व कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या पत्नी तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. उर्मिला कराड यांना सोमवारी मानवतातीर्थ रामेश्वर रूई येथे गोड जेवणानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी बिहार, आंध्रप्रदेश येथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, आध्यात्मिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रध्दांजी वाहिली.

यावेळी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, पं. वसंतराव गाडगीळ, केशवकुमार झा, आ. रमेशअप्पा कराड, डॉ. हनुमंत कराड, डॉ. मंगेश कराड, डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर, डॉ. सुनिल कराड, राजेश कराड, बालासाहेब कराड, पुनम कराड – नागरगोजे, प्रा. स्वाती कराड – चाटे, ज्योती कराड – ढाकणे, डॉ. सुचित्रा कराड – नागरे यांच्यासह कराड परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी हैद्राबादचे आमदार श्रीरंग राजू म्हणाले,“डॉ. कराड परिवार आमच्या गावी आल्यावर त्यांनी येथील मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. साहित्यीक उर्मिला काकू अतिशय प्रेमळ स्वभावाच्या होत्या. आज त्यांच्या जाण्याने कराड परिवारावर जे दुःख ओढवले आहे ते सहन करण्याचे बळ दयावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले,“ डॉकराड घराण्यांशी माझे जवळीक संबंध आहेतउर्मिला काकू यांना भेटणारा प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची सतत प्रेरणा मिळत असेकाकूंच्या अचानक जाण्याने जे दुःख त्यांच्यावर आले त्यातून सावरण्याची शक्ती मिळो.”

भाजपा प्रवक्ता गणेश हाके पाटील म्हणाले,“ उर्मिला काकू या साहित्यिक असल्याने त्यांचा आणि माझा जवळचा सबंध होता. त्यांचा आधार हा सर्वांना सावली सारखा होतो. अतिशय संवेदनशील, प्रतिभाशाली असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. आज आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पीत करतो.”

यावेळी श्रीमती शशीकला भिकाजी केंद्रे, आचार्य रतनलाल सोनाग्रा, गोदावरीताई मुंडे, हभप भगवान महाराज कराड, हभप भानुदास महाराज तुपे, बाबा महाराज काटगावकर, यशवंत महाराज घुले, किसन महाराज पवार, भोसले गुरुजी, दत्ता दत्तात्रय बडवे, पं. उध्दवबापू अप्पेगावकर, दत्ता महाराज तांदळवाडीकर, यशवंत महाराज घुले, बजरंग महाराज फड, श्रीमती सानप, दत्तात्रय बडवे, तुळशीराम गरुजी, व्यावसायीक रूद्र राजू, श्रीमती सानप, मन्मथजी यांच्या बरोबरच अनेकांनी तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. उर्मिला वि. कराड यांच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी ह.भ.प. श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरिकर यांचे गोड जेवणानिमित्त हरिकिर्तन झाले. या प्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, वै. उर्मिला वि. कराड या ब्रह्म योग तपस्विनी होत्या. त्यांनी जरी भौतिक जगाला निरोप दिला असला तरीही त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम, सद्भावना आणि मूल्यांचे शिक्षण प्रत्येकाचे व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असेन. त्यांनी कराड परिवारासह अनेकांना संस्कार व शिक्षण देऊन खुप मोठे केले आहे. एमआयटी संस्थेच्या प्रगतीमध्ये प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखिका म्हणून त्यांनी समाजात त्यांची ओळख निर्माण केली होती.

उर्मिला काकू या कल्पवृक्षाप्रमाणे जीवन जगल्या. त्यांच्या आठवणी स्मृणार्थ राहाव्यात याकरिता या कार्यक्रमास उपस्थितांना कराड परिवारातर्फे कल्पवृक्ष व उर्मिला काकू लिखित ग्रंथांचे वाटप करण्यात आले.