मुकुंदराज माध्यमिक विद्यालयातील दत्ता राजे यांना पीएच.डी प्रदान

मुकुंदराज माध्यमिक विद्यालयातील दत्ता राजे यांना पीएच.डी प्रदान

लातूर – तालुक्यातील नांदगाव येथील माईर्स एमआयटी पुणे संचलित मुकुंदराज माध्यमिक विद्यालयातील शिक्षक दत्ता बाबुराव राजे यांना संगीत विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे.

‘धनगर समाजाचे लोकसंगीत – एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात त्यांनी पीएच. डी. चे संशोधन पुर्ण केले असून या संशोधन कार्यासाठी त्यांना औरंगाबाद येथील प्रा. डॉ. पराग चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्द्ल दत्ता राजे यांचे मुकुंदराज माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. हनुमंत कराड, मुख्याध्यापक सायस मुंढे, तालमणी डॉ. राम बोरगावकर, सुरमनी पं. बाबुराव बोरगावकर, प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. संतोष बिडकर, प्रा. शशिकांत देशमुख, प्रा. शंकर जगताप, प्रा. हरीश कुलकर्णी, मनोज राजे यांच्यासह मुकुंदराज माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतून अभिनंदन होत आहे.