भूलशास्त्र हे प्रत्येक शस्त्रक्रियेची जीवनरेखा - डॉ. एन. पी. जमादार; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक भूलशास्त्र दिन साजरा
भूलशास्त्र हे प्रत्येक शस्त्रक्रियेची जीवनरेखा - डॉ. एन. पी. जमादार; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक भूलशास्त्र दिन साजरा

लातूर – सर्वसामान्य शस्त्रक्रियेपासून ते अतिशय गुंतागुंतीच्या शास्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी एका शल्यचिकित्सकास भूल तज्ज्ञाची जोड असावी लागते. रुग्णास भूल दिल्यापासून ते शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्ण शुध्दीवर येईपर्यंत शल्यचिकित्सका प्रमाणे भूल तज्ज्ञांचेही कौशल्य पणाला लागत असतात. भूल तज्ज्ञांचे कार्य हे केवळ शस्त्रक्रियेपुरते मर्यादित नसून ते सर्वव्यापी आहे. आज भूलशास्त्र हे अतिशय प्रगत झाले असून या शास्त्रामुळे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया वेदनारहित होत असून भूलशास्त्र हे प्रत्येक शस्त्रक्रियेची जीवनरेखा ठरत आहे, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात तथा भूल तज्ज्ञ डॉ. एन. पी. जमादार यांनी केले.
लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. एन. पी. जमादार बोलत होते. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. एच. मिश्रा, भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. टी. के. कारंडे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, भूल तज्ज्ञ डॉ. बी.बी. जाधव, डॉ. भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमेरिकेत डॉ. डब्यु. टी. जी. मॉर्टन यांनी 16 ऑक्टोंबर 1846 मध्ये शस्त्रक्रियेसाठी ईथर औषधी वापरून पहिली भूल देऊन शस्त्रक्रिया यशस्वी करुन भूलशास्त्राचा पाया रचला. त्यानंतरच्या भूलशास्त्राचा जगभरात प्रसार होऊन पुढे शस्त्रक्रिया भूलेअंतर्गत होऊ लागल्या असे सांगून यावेळी पुढे बोलताना यावेळी डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, भूल अर्थात बधिरीकरण शास्त्रामुळे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया वेदनारहित करणे शक्य होत आहे. पुर्वी भूलीसाठी ईथर या एकमेव औषधाचा वापर होत होता. मात्र आता बदलत्या काळानुसार अत्याधुनीक, नविन औषधी व यंत्रसामुग्रीचा वापर करुन अत्यंत गुंतागुतीच्या व क्लिष्ठ अशा ह्रदय, यकृत प्रत्यारोपन, मेंदू च्या विविध शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया भूलशास्त्रामुळे यशस्वी होत आहेत. भूल तज्ज्ञांचे काम हे केवळ शस्त्रक्रियेपुरती भूल देणे नसून त्यांच्या कामाची व्याप्ती ही शस्त्रक्रियेपुर्वी रुग्णाची योग्य स्थिती निर्माण करणे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या सर्व जैवीक प्रक्रिया जसे की, ह्रदयाचे ठोके, रक्तदाब आदींचा योग्य समतोल राखणे व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला भूलेच्या प्रभावापासून सुखरुपणे बाहेर काढणे अशी अशी अतिशय महत्त्वाची जबाबदारी भूल तज्ज्ञांची असते असे डॉ. जमादार यांनी सांगीतले.
यावेळी भूल तज्ज्ञ डॉ. बी. बी. जाधव यांनी भारतातील भूलशास्त्राचा इतिहास ते सध्या स्थितीबद्द्ल माहिती दिली तर उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांनी भूल तज्ज्ञ हा पडद्या मागचा कलाकार असून वैद्यकीय क्षेत्रातील भूल शाखेचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. तसेच डॉ. पी. एच. मिश्रा यांनी भूलशास्त्र हा वैद्यकीय शास्त्राचा मत्त्वाचा भाग असून पेन मॅनेजमेंट ते स्पेशालीटी अशी या शास्त्राची वाटचाल होत स्पष्ट केले.
यावेळी डॉ. शुभव ओस्तवाल व डॉ. धिरज केंद्रे यांनी उपिस्थितांना कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट (सीओएलएस) अर्थात जीवन संजीवनीचे प्रशिक्षण दिले. ह्रदयाचे कार्य अचानक बंद झाल्यास रुग्णाच्या छातीवर ठरावीक दाब देऊन ह्रदय पुर्ववत कार्यक्षम करण्यासाठी ही प्रक्रिया उपयोगी ठरते. यावेळी डॉ. मालु, डॉ. शैला बांगड, डॉ. शितल शेळके, डॉ. चेतन सावरीकर, डॉ. मुशीर शेख, डॉ. प्रिती, डॉ. राजेश कवळास, डॉ. शेळके, डॉ. मुक्तार शेख, डॉ. महेश चोपडे, डॉ. संजय बेंबडे, डॉ. रमेश भोसले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभव ओस्तवाल व डॉ. धिरज केंद्रे यांनी केले तर आभार डॉ. मुक्तार शेख यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी डॉ. अमोल होळंबे, डॉ. घनश्याम सांगवीकर, डॉ. प्रियंका भाले, डॉ. अंजली तिडके, डॉ. वैदेही रावळे, डॉ. शुभांगी शिंगरवाडे, लिपीक बंडोपंत कुलकर्णी, सेवक अक्षय कराड यांनी परिश्रम यांनी परिश्रम घेतले.