माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात स्व. सौ. उर्मिला विश्वनाथराव कराड यांना श्रध्दांजली

माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात  स्व. सौ. उर्मिला विश्वनाथराव कराड यांना श्रध्दांजली

लातूर – ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक – विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी स्व. सौ. उर्मिला विश्वनाथराव कराड यांना गुरुवार, दि. 21 जुलै रोजी येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात श्रध्दांजली कार्यक्रमात प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शोकाकुल वातावरणात स्व. उर्मिला कराड यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमोल डोईफोडे, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, एमआयएनएस निर्संग महाविद्यालयाचे प्रा. के. संतोशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 श्रध्दांजली कार्यक्रमात बोलताना प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री म्हणाल्या की, स्व. सौ. उर्मिला विश्वनाथराव कराड यांच्या अकस्मिक निधनामुळे संपूर्ण कराड कुटूंबीय व माईर एमआयटी परिवार दु:खात लोटला आहे. स्व. उर्मिला कराड या कुटूंबवत्सल, अतिशय मनमिळावू, सर्वांना सोबत घेवून चालणाऱ्या आणि एमआयटी परिवाराच्या माय माऊली होत्या. त्यांनी माईर एमआयटी समुहाच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मोलाची साथ दिली. त्यांनी कराड कुटूंबीय व एमआयटी परिवाराचा गाडा साभांळत असताना एक कवयित्री, लेखिका म्हणून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे एमआयटी परिवाराने मायेचा पदर गमावला असल्याचे डॉ. मंत्री म्हणाल्या. यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा दडगे, दंत शल्यचिकित्सक प्रा. डॉ. अमोल डोईफोडे, प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, प्रा. के. संतोशकुमार यांनी आपल्या शोक संदेशातून स्व. उर्मिला कराड यांना भावपुर्ण आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे यांनी केले.

यावेळी श्रध्दांजली कार्यक्रमास डॉ. बबन आडगावकर, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. नृसिंह कुलकर्णी, डॉ. टी. के. कारंडे, डॉ. लक्ष्मण कस्तुरे, डॉ. मुकूंद भिसे, डॉ. ए. पी. पिचारे, डॉ. शिला कुलकर्णी, डॉ. विद्या कांदे, डॉ. राजेंद्र मालु, डॉ. गितकुमार हाजगुडे, डॉ. व्दारकादास तापडीया, डॉ. संजिवनी मुंडे, डॉ. बस्वराज वारद, डॉ. म्हेत्रे, डॉ. दवणे, डॉ. इरपतगिरे, डॉ. फिरोज पठाण, डॉ. महेश उगले, डॉ. प्रमोद कुलकर्णी, डॉ. अभिजीत रायते, डॉ. शिराज बादल, डॉ. सुसेन गाजरे, डॉ. गोपाळ नागरगोजे, डॉ. सोमनाथ गित्ते, प्रशासकीय अधिकारी मधुकर गुट्टे, श्रीपती मुंडे, श्रीधर घुले, चंद्रकांत कातळे, रोखपाल भास्कार दहिफळे, नर्सिंग अधिक्षक एस्तर जोसफ, सह अधिसेवक मारुती हत्ते, कार्यालयीन अधिक्षक बळीराम हांडगे, डॉ. जावेद सिद्द्की, डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ. श्याम जुनागडे, डॉ. गौरव भटनागर, डॉ. रिषा कांबळे, डॉ. संदेश लोंढे, डॉ. शितल घुले, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. प्रमोद गायसमुद्रे, डॉ. जिशांत शेख, डॉ. सलीम शेख, प्रा. चिन्नास्वामी, प्रा. पद्मावती, प्रा. सोनाली दराडे, प्रा. पांडूरंग तोंडे, प्रा. केशव सिरसाट, प्रा. अर्चना हंगे, प्रा. नितीन होळंबे, प्रा. कोमल पेटकर, प्रा. क्रांती जाधव यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय, एमआयएनएस निर्सिंग महाविद्यालय आणि एमआयओ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील डॉक्टर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी हजर राहून श्रध्दांजली वाहिली.