राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात 74 रुग्णांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी
राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात 74 रुग्णांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी
राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात 74 रुग्णांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी
लातूर, दि. 8 – येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील कान – नाक - घसा विभाग व एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील सार्वजनिक दंत आरोग्य विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात दंत रोगाच्या 74 रुग्णांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, कान – नाक – घसा विभाग प्रमुख डॉ. शैला बांगड, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, सार्वजनिक दंत आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. शितल शेळके, डॉ. भागवत केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मौखिक आरोग्य शिबिरात दंत रोग तज्ज्ञांकडून रुग्णांची मुख व दंत रोग, मुख कर्करोग, तोंडात उद्भवणारे पांढरे – लाल चट्टे, हिरड्या व त्यासबंधी आजार अशा 74 रुग्णांची तपासणी करुन योग्य निदान करण्यात आले. या आरोग्य शिबिरात डॉ. भागवत केंद्रे, डॉ. ललित राणे, डॉ. तेजस आठल्ये, डॉ. अनुजा नावंदर, डॉ. पुजा मुंडे, डॉ. सायली मोरे, डॉ. नेहा लिंबोरे, डॉ. प्रांजली नन्हे, डॉ. मिरा मुंडे, डॉ. राधिका मुंडे, डॉ. चैताली लोढा, डॉ. राशी लटपटे, डॉ. निमीशा भाग्यवंत, डॉ. कैलास मालशेटवार यांनी सेवा बजावली. तसेच दंत चिकित्सा शास्त्र विभागात मौखिक आरोग्य दिनानिमित्त् रुग्णांना दंत मॉडेलच्या सहाय्याने दातांची किड, कीड निर्मूलन, रुट कॅनल उपचार या विषयी माहिती देण्यात आली.