एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाल दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना डहाके यांना पीएचडी प्रदान
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाल दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना डहाके यांना पीएचडी प्रदान
लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बालरोग विभागातील सहाय्यक प्रा. तथा बाल दंत रोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना त्र्यंबकराव डहाके यांना बाल दंत शास्त्र या विषयात नुकतीच पीएचडी प्रदाण झाली आहे.
दत्ता मेघे इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा या अभिमत विद्यापीठातील बाल दंत रोग विभाग प्रमुख डॉ. निलीमा ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्राथमिक दातांसाठी अस्पष्ठ सामग्री म्हणून तिहेरी प्रतिजैविक पेस्टची उत्क्रांती’ या विषयावर डॉ. प्रसन्ना डहाके यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. या शोधप्रबंधाच्या प्रायोगिक परिणामांवर आधारीत निकषांसाठी डॉ. डहाके यांना तीन भारतीय पेटंट मिळाले आहेत. यापूर्वी त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात 10 शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत.
डॉ. डहाके यांना पीएचडी मिळाल्याबद्द्ल त्यांचे एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, उप प्राचार्य डॉ. सुरेश कांगने, बाल दंत रोग विभाग प्रमुख डॉ. योगेश काळे, डॉ. महेश दडपे, डॉ. श्रीकांत केंद्रे, डॉ. श्रावणी माणकर, डॉ. प्रियंका मुंडे, डॉ. पुनम गवळी यांनी अभिनंद केले आहे.