आयसीएमआरच्या शॉर्ट टर्म स्टुडन्टशिप प्रोग्रामसाठी एमआयएमएसआरचे प्रजय गिरी, देवांग कुलकर्णी यांची निवड

आयसीएमआरच्या शॉर्ट टर्म स्टुडन्टशिप प्रोग्रामसाठी  एमआयएमएसआरचे प्रजय गिरी, देवांग कुलकर्णी यांची निवड

लातूर – येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. तृतीय वर्षातील विद्यार्थी प्रजय गिरी व देवांग कुलकर्णी यांची इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), न्यू दिल्ली यांच्या शॉर्ट टर्म स्टुडन्टशिप प्रोग्राम 2022 (STS 2022) साठी नुकतीच निवड झाली आहे. देशभरातील शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतून सदरील संशोधनासाठी ही निवड झाली आहे.

गेल्या जानेवारी 2022 मध्ये आसीएमआरने शॉर्ट टर्म स्टुडन्टशिप प्रोग्राम 2022 या संशोधन कार्यासाठी देशभरातील एम.बी.बी.एस. व बी.डी.एस. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यामध्ये एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. यामध्ये नऊ पैकी एम.बी.बी.एस. तृतीय वर्षातील प्रजय गिरी व देवांग कुलकर्णी या दोन विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘कोरोना पश्चात रुग्णांना उच्च रक्तदाब’ या विषयावर देवांग कुलकर्णी तर ‘आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मेथिसिलिन प्रतिरोधक स्टॅफिलोकोकस ऑरियस अनुनासिक वाहकांचा प्रसार आणि अनुनासिक डिकोलोनायझेशन थेरपीची प्रभावीतता’ या विषयावर प्रजय गिरी संशोधन करणार आहेत.

येत्या ऑक्टोबर 2022 पर्यंत सदरील संशोधन पुर्ण करुन ते आसीएमआरकडे सादर करावयाचे आहे. या संशोधन कार्यासाठी आयसीएमआर कडून प्रत्येकी संशोधनासाठी रु. 50 हजार एवढे विद्यावेतन मिळणार आहे. या संशोधनासाठी सबंध देशभरातील एम.बी.बी.एस. व बी.डी.एस. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रस्तावातून निवडक 1531 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत अशा संशोधन कार्यासाठी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

या निवडीबद्द्ल प्रजय गिरी व देवांग कुलकर्णी यांचे एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचाल आ. रमेशअप्पा कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री, मार्गदर्शक डॉ. गजानन गोंधळी, डॉ. अभिजीत रायते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यातून अभिनंदन होत आहे.