फिजिओथेरपी क्षेत्रातील तज्ज्ञांचा ‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ मध्ये गौरव देश-विदेशातील तज्ज्ञांना पुरस्कार देत मान्यवरांच्या हस्ते गौरव
फिजिओथेरपी क्षेत्रातील तज्ज्ञांचा ‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ मध्ये गौरव देश-विदेशातील तज्ज्ञांना पुरस्कार देत मान्यवरांच्या हस्ते गौरव
लातूर – फिजिओथेरपी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन, आरोग्यसेवा व अध्यापनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील तज्ज्ञांचा भव्य सन्मान सोहळा ‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ या आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपी परिषदेत पार पडला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी, लातूर येथील संत ज्ञानेश्वर डोममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अलाईड हेल्थ सायन्सचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रविण कुमार, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, फिलिपिन्सचे डॉ. ख्रिश्चियन रे डी. रिमांडो, थायलंडचे डॉ. वॉरीन क्रित्यकिआराना, डॉ. विरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ. सुभाष खत्री आणि डॉ. सिंगारावेल्लन यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील नामांकित फिजिओथेरपी महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या परिषदेत शिक्षण, संशोधन, क्लिनिकल आणि अकादमिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये वार्षिक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार – जानवी चंद्रसेन विश्वकर्मा (डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी, पुणे), यंग अचिव्हर अवॉर्ड – डॉ. रुपम सरकार, डॉ. रमणदीप कौर सैनी, डॉ. निकिता हितेश सेठ, डायनॅमिक फिजिओ पुरस्कार – डॉ. पूजा वैजनाथ आचार्य, डॉ. ममता शेट्टी, क्लिनिकल एमिनेन्स (वरिष्ठ) पुरस्कार – डॉ. वैभव श्रीकांत डोळस, क्लिनिकल प्रतिष्ठित पुरस्कार – डॉ. शेफाली अनिल कुमार बोधना, डॉ. कोमल ब्रह्मभट्ट, सर्वोत्कृष्ट फिजिओ पुरस्कार – डॉ. त्रिवेणी शेट्टी या देण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार मध्ये कनिष्ठ श्रेणी – डॉ. श्रुतिका परब, डॉ. आभा खिस्ती, वरिष्ठ श्रेणी – प्राचार्य डॉ. अस्मिता मोहरकर, शैक्षणिक प्रतिष्ठित पुरस्कार – डॉ. रीमा जोशी, डॉ. ईशा आकुलवार-ताजणे, सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार – प्राचार्य डॉ. आकांक्षा जोशी, स्टुडंट ऑफ द इयर (पीजी वर्ग) – डॉ. निधी पंड्या, डॉ. किरण नागरगोजे, प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार – डॉ. स्नेहा नारलावार, अकादमिक इमिनन्स अवॉर्ड – डॉ. टी. पूविष्णू देवी यांना देण्यात आला.

इलेक्ट्रोथेरपी आणि अकादमिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्द्ल सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार (इलेक्ट्रोथेरपी, वरिष्ठ श्रेणी) – प्राचार्य डॉ. वैभव महाजन, शैक्षणिक प्रतिष्ठित पुरस्कार – प्रा. डॉ. जफर अजीम, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार (वरिष्ठ श्रेणी) – प्रा. डॉ. विजय पंडिता, उत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार – प्रा. डॉ. नूपूर कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार – प्राचार्य डॉ. आशीर्वाद महाजन, प्रा. डॉ. शिल्पा खंदारे, सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार (इलेक्ट्रोथेरपी वरिष्ठ) – सहयोगी प्रा. डॉ. वेणू मोहन डी, डायनॅमिक फिजिओ पुरस्कार – सहयोगी प्रा. डॉ. स्मिता शिंदे, सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार (वरिष्ठ श्रेणी) – प्राचार्य प्रा. डॉ. सुरेंद्र वाणी,

डॉ. जय रामकिशन गुप्ता, प्रा. डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार (कनिष्ठ श्रेणी) – डॉ. मोहम्मद झिशान, डॉ. तृप्ती देशमुख, डॉ. पवन कुमार, शैक्षणिक प्रतिष्ठित पुरस्कार – प्रा. डॉ. संगीता एम इलेक्ट्रोथेरपी आविष्कारक पुरस्कार – प्रा. डॉ. आदित्य वैद्य, स्टुडंट ऑफ द इयर (पदव्युत्तर) – डॉ. सुनिधी शिंदे, अकादमीशियन ऑफ द इयर – प्राचार्य डॉ. राधा भट्टड, क्लिनिकल एमिनन्स पुरस्कार – डॉ. हर्षा मंत्री, डायनॅमिक फिजिओ पुरस्कार – डॉ. मधुर कुलकर्णी, डॉ. तुषार लिंगायत, डॉ. शीतल बाम्हणे, सर्वोत्कृष्ट अकादमीशियन पुरस्कार – डॉ. धनश्री शिंदे, उत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार – डॉ. परवीन पठाण व शैक्षणिक प्रतिष्ठेचा पुरस्कार – प्रा. डॉ. विष्णू वर्धन जी. डी. यांना देण्यात आला.

या परिषदेत फिजिओथेरपी शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, उपचार पद्धती आणि संशोधन विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

